UBT: विधानसभा निकालापूर्वी भाजपाचा ‘हा’ नेता उबाठा गटात सामील

180

राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान २० नोव्हेंबर रोजी झाले. तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान निकाल जाहीर होण्यापूर्वी भाजपाला माहीम विधानसभेतून मोठा धक्का मिळाला आहे. मुंबई भाजपाचे सचिव आणि माहीम येथील पक्षाचे नेते सचिन शिंदे (Sachin Shinde) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.

(हेही वाचा – Waqf Board Amendment Bill विषयी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार)


माहीम विधानसभा (Mahim Assembly) मतदारसंघातील भाजपाचे उपाध्यक्ष सचिन शिंदे विधानसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच शुक्रवारी दुपारी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. सचिन शिंदे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचत उद्धव ठाकरे यांच्याहातून शिवबंधन बांधून घेतले. यावेळी माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते.

(हेही वाचा – वंचितला सत्तेपासून वंचित रहायचे नाही; Prakash Ambedkar यांचा काय आहे प्लॅन ?)

सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाची (Mahim Assembly Constituency) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये शिवसेना (ShivSena),  उबाठा पक्ष (UBT Group) आणि मनसे (MNS) अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackrey) तर उबाठा गटांकडून महेश सावंत तर शिवसेनेकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.