- ऋजुता लुकतुके
पर्थ कसोटीच्या दिवशी तीनही सत्रांत मिळून एकूण फक्त २१७ धावा झाल्या आणि त्यासाठी तब्बल १७ बळी गेले. अशा या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या दिवसावर पहिल्या दिवशी तरी भारताचं वर्चस्व आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे ७ गडी बाद करत भारताने दिवसअखेर ८२ धावांची आघाडीही मिळवली आहे. तर ऑस्ट्रेलियाचे तळाचे ३ फलंदाज बाकी आहेत. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करताना १५० धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियन संघ ७ बाद ६७ वर आहे. (Ind vs Aus, Perth Test)
पण, दोन्ही डावांत फलंदाजांचीच चूक जास्त होती. सकाळच्या सत्रात चेंडू चांगलाच उसळत होता आणि ऊनही पडलेलं नव्हतं. अशा वातावरणात भारतीय आघाडीची फळी जयस्वाल (०), पड्डिकल (०), विराट (५) आणि राहुल (२३) धावा करून बाद झाले. पुढे रिषभ पंतने ३७ आणि नितिश रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा करत निदान भारतीय संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. बाकी सगळे फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. जोस हेझलवूडने २९ धावांत ४ बळी मिळवले. तर मार्श, स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. (Ind vs Aus, Perth Test)
That’s Stumps on what was an engrossing Day 1 of the 1st #AUSvIND Test!
7⃣ wickets in the Final Session for #TeamIndia! 👌👌
4⃣ wickets for Captain Jasprit Bumrah
2⃣ wickets for Mohammed Siraj
1⃣ wicket for debutant Harshit RanaScorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/1Mbb6F6B2c
— BCCI (@BCCI) November 22, 2024
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: ईव्हीएम नेले त्या बसमध्ये शेवटच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल !)
त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघही अनपेक्षितपणे गडगडला. शेवटच्या एका सत्रात बुमरा, सिराज आणि हर्षित राणाने मिळून ७ गडी गारद केले. बुमराहने १७ धावांत ४ बळी मिळवताना कमाल केली. त्यानेच उस्मान ख्वाजा (८) आणि मॅकस्विनी (१०) यांना झटपट गुंडाळत भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लबुशेनचा सोपा झेल दुसऱ्या स्लिपमध्ये विराट कोहलीने सोडला. पण, त्यानंतर बुमराहने स्टिव्ह स्मिथला सुरेख चेंडूवर पायचित पकडलं आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १९ केली. तर पदार्पणात चांगली गोलंदाजी करताना हर्षित राणाने धोकादायक ट्रेव्हिस हेडला ११ धावांवर त्रिफळाचित केलं. (Ind vs Aus, Perth Test)
मोहम्मद सिराजनेही आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये लबुशेन आणि मिचेल मार्श यांचे बळी मिळवले आणि दिवसाच्या शेवटी पुन्हा गोलंदाजीला आलेल्या बुमराने मग पॅट कमिन्सला बाद करत पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व प्रस्थापित केलं. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाकडे पहिल्या डावात आघाडी घेण्याची नामी संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध नीच्चांकी धावसंख्येवर बाद करण्याची संधीही भारताकडे आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटीत २०२० मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ८३ धावांत सर्वबाद झाला होता. एकंदरीत पर्थ कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. (Ind vs Aus, Perth Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community