- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वरळी विधानसभा निवडणुकीतील उबाठा शिवसेनेचे आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिहेरी लढतीत आता डार्क हॉर्स कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघातील बीडीडी चाळ, पोलिस वसाहती आणि वरळी कोळीवाड्यातील झालेले एकगट्टा मतदान हे परंपरागत उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराच्या पारड्यात न पडल्याने नक्की कुणाच्या पार पारड्यात पडली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची सूचना असल्याने मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा यांच्यातील अटीतटीच्या लढतीत कुणाच्या गळ्यात विजयाची माळा पडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
वरळी विधानसभा मतदारसंघात ५३ टक्के मतदान झाले असून वरळीमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत साडेतीन टक्क्यांनी मतदान वाढले असून सन २०१४च्या तुलनेत २ टक्क्यांनी मतदान कमी झालेले आहे. या मतदारसंघात ७५ हजार ६९९ पुरुष आणि ६५ हजार ८८२ महिला मतदारांसह इतर ४ अशाप्रकारे १ लाख ४१ हजार ५८५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात मोठ्या प्रमाणात मनसे आणि शिवसेनेला मतदानात बाजी मारल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा – UBT: विधानसभा निकालापूर्वी भाजपाचा ‘हा’ नेता उबाठा गटात सामील)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाडा आणि जांभोरी मैदान येथे दोन प्रचारसभा घेतल्या आणि या सभेमध्ये त्यांनी वरळीकरांना गॅरंटी देत संदीपला भेटायला आपल्याला पूर्वपरवानगी अर्थात अपॉईंटमेटची गरज राहणार नाही असे सांगत त्याला निवडून देण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानाच्यादिवशी दिसून आला असून पोलिस वसाहत, बीडीडी चाळ, वरळी कोळीवाडा येथील मतदान मोठ्या संख्येने मनसे आणि शिवसेनेलाच झाल्याची चर्चा वरळीत ऐकायला मिळत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उबाठा शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघात मोठा धक्का बसू शकतो किंवा अटीतटीच्या लढतीत त्यांचे मताधिक्य काठावर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर संदीप देशपाडे आणि मिलिंद देवरा यांचे कडवे आव्हान निर्माण झाल्याने तसेच मतांची टक्केवारी सन २०१९च्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याने या परिणाम निवडणूक निकालावर दिसेल. त्यामुळे वरळीचा गड नक्की कोण राखणा हे शनिवारी होणाऱ्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा – Swatantra veer Savarkar चित्रपटाने ‘इंडियन पॅनोरमा’ चा झाला शुभारंभ)
विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी विभागात कमी लक्ष दिले असून इतर उमेदवारांच्या प्रचार सभा आणि रॅलींना त्यांनी अधिक लक्ष दिले. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विधान परिषद सदस्य सुनील शिंदे आणि त्यांच्या टिमने मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदारांना आदित्य ठाकरे यांचे दर्शन न घडल्याने मतदारांमधील नाराजी उघडपणे दिसून आली आहे. आधीच आमदार झाल्यापासून त्यांचे दर्शन नाही आणि त्यातच तीन आमदार असूनही विभागात विकासकामे न झाल्याने काही अंशी मतदार हा नाराज असून त्यांच्यासमोर पर्याय निर्माण झाल्याने आदित्य ठाकरेंसमोरील धोके वाढल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community