Sanjay Raut यांनी उडवली Prakash Ambedkar यांची खिल्ली!

88
Sanjay Raut यांनी उडवली Prakash Ambedkar यांची खिल्ली!
  • खास प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ५०-६० जागा मिळाल्या तर महाविकास आघाडी सरकारमध्ये घेण्याबाबत त्यांचा विचार केला जाईल, असे सांगून शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकर यांची खिल्ली उडवली.

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापीवर हिंदू पक्षाचा मोठा विजय, शिवलिंगाच्या पाहणीत मुस्लिम पक्षाला धक्का)

गरज लागली तर विचार करू

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सकाळी पत्रकारांशी बोलताना वंचित आघाडीबाबत विधान केले. “प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर ५०-६० आमदार निवडून येत असतील, आणि आम्हाला गरज लागली तर आम्ही नक्की त्यांचा विचार करू. का विचार करायचा नाही? महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते. लोकसभेला ते आमच्यासोबत राहावे म्हणून आम्ही प्रयत्न केला, विधानसभेसाठी प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे आहे की ज्यांची सत्ता येते त्यांच्यासोबत राहणार. आमची सत्ता येते आहे त्यामुळे आंबेडकर आमच्यासोबत नक्की राहतील,” असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; ‘एक है तो सेफ है’ ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का)

वंचित बहुजन आघाडीला आतापर्यंत २०१९ किंवा २०२४ लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनाही ५०-६० जागांची अपेक्षा नसल्याने राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची खिल्ली उडवली, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(हेही वाचा – Assembly Election Results 2024: अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपाची मोठी फिल्डिंग; ‘या’ ६ नेत्यांवर सोपवली जबाबदारी)

दलित समाजाचा अपमान

शिवसेना (शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांचा अपमान केला आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून प्रकाश आंबेडकर यांचा अपमान म्हणजे समस्त दलित समाजाचा अपमान राऊत यांनी केला आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.