महाविकास आघाडीत Nana Patole यांना बाजूला केले?

63
महाविकास आघाडीत Nana Patole यांना बाजूला केले?
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांना शिवसेना उबाठाचा मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा नसल्याचे संकेत दिले. थोडक्यात महाविकास आघाडीतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतून बाजूला केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

नाना पटोलेंना टाळले?

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी विधानसभेसाठी मतदान झाले आणि शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी आणि मतमोजणीच्या आधी महाविकास आघाडीची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना टाळण्यात आले आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, शिवसेना उबाठाकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून जयंत पाटील बैठकीला उपस्थित होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतरही तीनही नेते एकाच गाडीने निघाले आणि त्यावेळी जयंत पाटील गाडी चालवत होते.

(हेही वाचा – Assembly Election Result : जिंकणाऱ्या आमदारांना कुठे ठेवू आणि कुठे नको हा मोठा प्रश्न)

जयंत पाटील राज्य चालवू शकतात

यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शनिवारी सकाळी मुख्यमंत्री कोण असणार हे आम्ही सांगणार आहोत. महाविकास आघाडीला १६० जागा मिळतील आणि आम्ही स्वबळावर सत्तेत येणार आहोत. त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व निष्णात ड्रायव्हर आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर असून त्यांना चांगले वाहन चालवता येते, हा माझा अनुभव आहे. काही लोकांसाठी ड्रायव्हिंग हे पॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात,” असे संजय राऊत म्हणाले.

निर्णय मुंबईतच दिल्लीत नाही

राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतून नाही तर महाराष्ट्रातून होईल, असेही स्पष्ट केले. “कॉंग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून मुंबईत येतील ते मँडेट घेऊनच यावे लागेल. शरद पवार मुंबईतच असतात, उद्धव ठाकरे मुंबईतच आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाची लोक आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील, इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत. ते गौतम अदानीलाही घाईघाईत मुख्यमंत्री करतील,” असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.