विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर Mumbai Police सतर्क; १० हजार पोलीस तैनात

34
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी झाले. तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निकालाची राज्यभर उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत निवडणूक आयोगांकडून मोठ्या प्रमाणात पोलीसांचा (Mumbai Police) फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे.  (Mumbai Police)
मुंबईतील (Mumbai) ३६ मतदारसंघांसाठी एकूण ३६ केंद्रांवर मतमोजणी होणार असून दोन हजार ७०० हून अधिक कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून (BMC) देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

(हेही वाचा – राहुल गांधी, खरगे आणि सुप्रिया श्रीनेट यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार; Vinod Tawde यांचा इशारा)

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मुंबईतील ३६ मतदारसंघांत ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये १०५ उमेदवार मुंबई शहरात, तर ३१५ उमेदवार मुंबई उपनगरातील आहेत. बुधवारी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे संबंधित मतदारसंघाच्या स्ट्रांग रूममध्ये (Strong room) कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्यासह राखीव पोलिस दल तसेच पोलिस तैनात आहेत. सर्व स्ट्रॉग रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत.

हेही पाहा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.