IPL 2025 : पुढील वर्षी आयपीएल ‘या’ तारखेला होणार सुरू, आगामी ३ वर्षांचं आयपीएल वेळापत्रक जाहीर

IPL 2025 : पुढील वर्षी मार्चच्या मध्यावर आयपीएल सुरू होणार आहे. 

49
IPL 2025 : पुढील वर्षी आयपीएल 'या' तारखेला होणार सुरू, आगामी ३ वर्षांचं आयपीएल वेळापत्रक जाहीर
  • ऋजुता लुकतुके

एकीकडे आयपीएलसाठी खेळाडूंच्या मेगा लिलावाची तयारी संघ करत असतानाच बीसीसीआयने आगामी वर्षासाठी लीगचं वेळापत्रक जारी केलं आहे. फक्त पुढचाच हंगाम नाही तर पुढील दोन हंगामांसाठीच्या तारखाही बीसीसीआयने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पुढील हंगाम १४ मार्चला सुरू होऊन तो २५ मे ला संपणार आहे. एकाच वेळी तीन हंगामांच्या तारखा जाहीर करून बीसीसीआयने या लीगची लोकप्रियता आणि जागतिक क्रिकेटवर लीगची असलेली मक्तेदारी स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर हे बीसीसीआयचं महत्त्वाकांक्षी पाऊलही आहे. (IPL 2025)

आयपीएलने दिलेल्या तारखेप्रमाणे २०२५ मध्ये १४ मार्चपासून सुरू होणार असून त्याची अंतिम फेरी २५ मे रोजी होणार आहे. २०२६ चा हंगाम १५ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाईल, तर २०२७ चा हंगाम १४ मार्च ते ३० मे दरम्यान खेळवला जाईल. (IPL 2025)

(हेही वाचा – Sanjay Raut यांनी उडवली Prakash Ambedkar यांची खिल्ली!)

आयपीएल २०२५ साठी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. एकूण ५७४ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने पुढील तीन हंगामांसाठी काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएलचे हे मोठे पाऊल आहे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, गुरुवारी फ्रँचायझींना पाठवलेल्या ईमेलमध्ये, आयपीएलने स्पर्धेच्या तारखांची विंडो दिली आहे. ही शेवटची तारीख असण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. जेव्हा बीसीसीआयने आपले हक्क विकले तेव्हा प्रत्येक हंगामात ८४ सामने खेळण्याची चर्चा होती, परंतु अद्याप तसे झाले नाही. (IPL 2025)

यावेळी ५७४ खेळाडूंपैकी ४८ अनुभवी भारतीय खेळाडू, १९३ अनुभवी परदेशी खेळाडू, ३ असोसिएट सदस्य देशांचे खेळाडू, ३१८ अननुभवी भारतीय खेळाडू आणि १२ अननुभवी परदेशी खेळाडूंचा मेगा लिलावात समावेश आहे. या खेळाडूंपैकी केवळ २०४ खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये कमाल ७० परदेशी खेळाडूंना विकत घेण्याची मुभा संघांना आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.