विधानसभा निवडणूक हा MNS समोर अस्तित्वाचा प्रश्न; मान्यता टिकविण्याची धडपड

79
विधानसभा निवडणूक हा MNS समोर अस्तित्वाचा प्रश्न; मान्यता टिकविण्याची धडपड
विधानसभा निवडणूक हा MNS समोर अस्तित्वाचा प्रश्न; मान्यता टिकविण्याची धडपड

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत १२३ जागांवर उमेदवार दिले आहेत. राज ठाकरे यांनी २००७ मध्ये शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची (MNS) स्थापना केली. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. या वेळेच्या निवडणुकीत मनसेला ३ आमदार निवडून आणता आले नाहीत, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – Live : Maharashtra Assembly Election Result 2024 : मतमोजणीला सुरुवात; पोस्टल मतांचा कल लवकरच येणार हाती)

निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. जर या वेळी मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे.

नव्या नियमांचे उद्दिष्ट साध्य करणार – बाळा नांदगावकर

याविषयी मनसेचे (MNS) नेते आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले की, राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. यंदाच्या निवडणुकीत निश्चितच राज्यातील जनता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मागे ठामपणाने उभे राहिल्याचे आपल्याला दिसेल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार मतांचा टप्पा गाठणे आणि आमदार निवडून आणणे हे उद्दिष्ट आम्हाला निश्चितच साध्य करता येणार आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.