विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: बारामतीत ट्विस्ट! Ajit Pawar आघाडीवर की पिछाडीवर ?)
या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. निवडणुक प्रचारावेळी काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, आता बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आले आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Live : Maharashtra Assembly Election Result 2024 : मतमोजणीला सुरुवात; पोस्टल मतांचा कल लवकरच येणार हाती)
सकाळी १० वाजेपर्यंत महायुतीने तब्बल १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर मविआने अद्याप १०० चा आकडाही पार केलेला नाही. त्यामुळे महायुतीने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार सांगा पैकी चार मतदार संघात भाजपाची (BJP) मुसंडी मारली आहे. धुळे शहरात भाजपचे अनुप अग्रवाल, शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा आघाडीवर तर धुळे ग्रामीण मध्ये भाजपाचे राम भदाणे आघाडीवर शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे विजयकुमार रावळ आघाडीवर आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community