विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?)
विधानसभा निवडणुकांचे सुरूवातीचे निकाल हाती येत आहेत. एकट्या भाजपला १२७ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. भाजपच्या यशाचा पहिला जल्लोष कोथरूडमधून सुरू झाला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लाडू वाटत आपला विजय साजरा करायला सुरूवात केली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पिछाडीवर!)
कोथरूडमधून स्वतः चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आघाडीवर असून त्यांचा विजय आता निश्चित मानल जात आहे. त्याचवेळी यावेळी भाजपची इतिहासातील सर्वात चांगल्या कामगिरीकडे वाटचाल सुरू असून 131 ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर महायुतीने 221 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर आघाडी घेतली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: बारामतीत ट्विस्ट! Ajit Pawar आघाडीवर की पिछाडीवर ?)
आपला विजय साजरा करताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक वक्तव्य केलं आहे.ते म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत आले तर स्वागत आहे, मात्र तशी वेळ येईल असं वाटत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी १६० चा आकडा महायुतीकडे असेल. त्यामुळे कुणालाही बरोबर घेण्याची वेळ येणार नाही. परंतु पश्चाताप होऊन आमची वाट चुकली, आम्हाला पुन्हा यायचंय, असं कुणी म्हणालं, तर आमचं शीर्ष नेतृत्व मनाने मोठं आहे. जुनं काही लक्षात न ठेवता त्यांचं स्वागत करु.” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community