Maharashtra Assembly Election Result 2024 : श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे यांचा विजय निश्चित; ६७४४० मतांनी आघाडीवर

43

श्रीवर्धन विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) विसाव्या फेरीत ६७४४० मतांनी आघाडीवर आहेत. तर शरदचंद्र पवार गटाचे अनिल नागवणे (Anil nagavane) हे २७०४२ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांचा विजय होणार, हे असं चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचाही ही योजना राबवण्यात हातभार होता. त्यामुळे लाडक्या बहि‍णींनी आदिती तटकरेंचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं दिसत आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?)

दरम्यान, भाजपच्या १२५ जागा, शिवसेनेच्या ५५ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १३ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस २१ जागांवर आघाडी आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.