Maharashtra Assembly Election Result 2024 : माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पिछाडीवर; मनसेचा भाजपावर आरोप

113
Maharashtra Assembly Election Result 2024 : माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पिछाडीवर; मनसेचा भाजपवर आरोप
Maharashtra Assembly Election Result 2024 : माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पिछाडीवर; मनसेचा भाजपवर आरोप

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. माहीम मतदारसंघात मनसेने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना रिंगणात उतरवले होते. या ठिकाणी उबाठा गटाचे महेश सावंत, शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे अशी तिहेरी लढत होणार असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र अमित ठाकरे पिछाडीवर पडले असून तिसऱ्या स्थानी गेले आहेत. माहिममध्ये (Mahim Vidhan Sabha 2024) आठव्या फेरीअंती यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आठव्या फेरीत महेश सावंत यांना २४४५० मते मिळाली आहेत, सदा सरवणकर यांना ७४८०, तर अमित ठाकरे यांना ११८८६ मते मिळाली आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – मुख्यमंत्री कोण होणार ? भाजपाच्या ‘या’ नेत्याचा मोठं विधान; म्हणाले… )

महायुतीशी भांडुपच्या जागेविषयी चर्चा करूनही मनसेने ऐनवेळी माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने महायुतीचीच अडचण झाली होती. सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी माघार घ्यावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. आता अमित ठाकरे मतांच्या शर्यतीत मागे पडल्यानंतर मनसेचे नेते भाजपवर टीका करू लागले आहेत.

भाजपाने शब्द फिरवल्याचा मनसे नेत्यांचा आरोप

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने ऐनवेळी शब्द फिरवला. सुरुवातीला भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. आम्ही अमित ठाकरेंना समर्थन देणार असल्याचे बोलले होते. त्यानंतर अखेरच्या क्षणी भाजपाने आपला शब्द पाळला नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

भाजपचे केशव उपाध्ये यांनी मनसेच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. केशव उपाध्ये म्हणाले की, मनसे महायुतीचा भाग नव्हती. माहीमची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो निर्णय होता. आशिष शेलार यांनी समर्थन देण्याबाबत प्रयत्न केले होते. पण माहीम मतदारसंघातील उमेदवारी आणि त्याविषयीचे निर्णय घेणे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याचकडे होते. त्यामुळे असे आरोप करणे चुकीचे आहे, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

दरम्यान, राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, अमित ठाकरे यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवायचे होते, तर कमीत कमी दोन ते तीन महिने मनसेने महायुतीशी बोलणी सुरू करायला हवी होती. परंतु, मनसेने अमित ठाकरेंना अखेरच्या क्षणी रिंगणात उतरवले. परंतु, या आधीच वाटाघाटी करणे अपेक्षित होते, असे स्पष्ट मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.