राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात संपूर्ण राज्यातच महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) निकाल शनिवार २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहे. कणकवली विधानसभेत (Kankavali Assembly) महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत झाली होती. दरम्यान कणवली विधानसभा मतदारसंघ हा राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच कणकवलीत नितेश राणे (Nitesh Rane won the Assembly) यांना पुन्हा एकदा बहुमतांनी विजय झाला आहे. दरम्यान राणेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बालेकिल्ला कणकवलीत नितेश राणेंचा विजय
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा ५०३६२ मतांनी पराभव झाला आहे. तर नितेश राणे यांचा १०८३६७ मतांनी विजयी झाले आहेत. या विजयाची सुरुवात पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेत झाल्यामुळे मतमोजणी कक्षा बाहेर भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आमदार नितेश राणे येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत गुलाला उधळत आनंद व्यक्त केला आहे. नितेश राणेंच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – Assembly Election Result : भाजपाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक; मतांची टक्केवारीही अधिक)
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजय मिळत असल्याचं दिसून येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील या अतीतटीच्या सामन्यात भाजपा आणि शिवसेना उमेदवारांना राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.
हेही पाहा –