लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मोठे अपयश आले. आम्ही ते मान्य केले. त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. योजना प्रसिद्ध झाल्या. आमच्या योजनांवर भरपूर टीका टिप्पणी केली की, राज्य कंगाल केले; पण लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महाराष्ट्रात कोणत्याही आघाडीला एवढे यश मिळालेले नाही. यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. जसे आकडे समोर येत होते, तेव्हा मी देवेंद्रजींना, एकनाथ शिंदेंना म्हटले, खूप काम करायचे आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावना व्यक्त केल्या. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
(हेही वाचा – हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
मतदारांचे आणि सर्वांचे आभार मानतांना अजित पवार पुढे म्हणाले की, आमच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे. राज्यातील सर्व ६ विभागांमध्ये सगळीकडे महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून राज्य चालवू. ५ वर्षे एकोप्याने ही युती काम करेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. (Maharashtra Assembly Election Result 2024)
आता विरोधक म्हणत आहेत की, निवडणूक पुन्हा बॅलटपेपरवर घ्यावी. आताची निवडणूक बॅलटपेपरवर घ्यायची, तर लोकसभेची निवडणूकही बॅलेटपेपरवर घ्यायला हवी होती, असा टोलाही अजित पवार यांनी या प्रसंगी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community