रविवारी मध्य रेल्वेवर Mega Block; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक

67
रविवारी मध्य रेल्वेवर Mega Block; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २४.११.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) परीचालीत करणार आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेवर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत

उपनगरीय सेवांचे डायव्हर्शन : 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५७ (कर्जत लोकल S-17) ते दुपारी २.४२ (आसनगाव लोकल AN-15) पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद मार्गावरील उपनगरी ट्रेन्स ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकात थांबतील तसेच त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशीराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ (अंबरनाथ लोकल A-26) ते दुपारी ३.०६ (खोपोली लोकल KP-8) पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकात थांबतील आणि पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानी नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचेल. (Mega Block)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: कणकवलीत उद्धव ठाकरेंनी ‘वैभव’ गमावले)

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन : 

पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

• 12140 (नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस)
• 22160 (चेन्नई – छछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस)
• 22226 (सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत)
• 12168 (बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12321 (हावडा – छछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12812 (हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 11014 (कोइम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12142 (पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12294 (प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस)
• 11080 (गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 11060 (छापरा – ललोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12164 (चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)
• 12162 (आग्रा कँट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस)

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन : 

खालील डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. (Mega Block)

• 11055 (लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस)
• 11061 (लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्स्प्रेस)
• 17222 (लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्स्प्रेस)
• 11071 (लोकमान्य टिळक टर्मिनस- बरौनी एक्स्प्रेस)
• 13202 (लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटणा जं एक्सप्रेस)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)

मेल/एक्सप्रेस सेवांचे डायव्हर्शन :

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन ५व्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनस/दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप ६व्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील.

मेल/एक्स्प्रेस सेवांची शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन :

16346 (तिरुवनंथपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस) 22.11.2024 रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट होईल आणि पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दरम्यान सेवा रद्द राहील.

16345 (लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंथपुरम एक्स्प्रेस) दरम्यान २४.११.२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल येथे शॉर्ट ओरीजनेट केला जाईल. या ट्रेनची लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलच्या दरम्यान सेवा रद्द राहील.

अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. (Mega Block)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.