महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. (Maharashtra Assembly Election Result 2024) मात्र, आता चित्र स्पष्ट झालं आहे.
महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवून मविआला मोठा दणका दिला आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष मिळून 75 चा आकडा देखील गाठू शकलेले नाहीत. दरम्यान आता, नव्या सरकारच्या शपथविधीबाबत माहिती समोर येत आहे. येत्या सोमवारी (२५ नोव्हें.) नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. वानखेडे स्डेडियमवर (Wankhede Stadium) नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी (oath ceremony) 25 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-