Mahindra XUV700 : महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० कारच्या किमती अचानक का वाढल्या?

Mahindra XUV700 : महिंद्रा एसयुव्ही गाड्यांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. 

64
Mahindra XUV700 : महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० कारच्या किमती अचानक का वाढल्या?
  • ऋजुता लुकतुके

महिंद्रा एक्सयुव्ही ७०० ही महिंद्रा कंपनीची एक लोकप्रिय गाडी आहे. कंपनीने अलीकडेच या गाडीची किंमत ३०,००० ते ५०,००० रुपयांनी वाढवली आहे. गाडीच्या व्हेरियंटनुसार ही किंमत वाढवण्यात आली आहे. एएक्सएल ७ डिझेल ऑटोमॅटिक, डिझेल ७ सीटर आणि डिझेल ६ सीटर गाड्यांची किंमत ५०,००० रुपयांनी वाढली आहे. तर पेट्रोल गाड्यांची किंमत ३०,००० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे एक्सयुव्ही ७०० गाड्या आता २१.२९ लाख रुपयांपासून सुरू होऊन २३.९० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. (Mahindra XUV700)

(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महाविकास आघाडीला मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव )

तर याच प्रकारातील टॉप एंडच्या गाड्या २४.६९ लाख ते २५.४९ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत एक्सयुव्ही ७०० ही लोकप्रिय एसयुव्ही गाडी आहे. टोयोटा इनोव्हा, टाटा सफारी, ह्युंडे अल्काझार तसंच इनोव्हा क्रिस्टा या गाड्यांशी तिची स्पर्धा आहे. (Mahindra XUV700)

(हेही वाचा – शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार)

एक्सयुव्ही ७०० ही गाडी पेट्रोल तसंच डिझेल इंजिनांमध्येही उपलब्ध आहे. २ लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन १९७ बीपीएस इतकी शक्ती निर्माण करतं तर २.२ टर्बो इंजिन ८२ बीपीएच इतकी शक्ती निर्माण करू शकतं. गाड्यांमध्ये ६ स्पीड मॅन्युएल गिअर बॉक्स तसंच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध आहेत. गाडीची श्रेणी ही प्रिमिअम एसयुव्ही आहे. त्यामुळे आतील सीट या लेदरच्या आहेत. तसंच चालकाजवळ सगळे चटस्क्रीन कंट्रोलही देण्यात आले आहेत. गाडीतील क्लायमॅट कंट्रोल यंत्रणा ही अद्ययावत आहे. तसंच चालक सुरक्षा यंत्रणाही अव्वल श्रेणीतील आहे. एएक्स७ गाड्यांमध्ये चालकाच्या मदतीसाठी ३६० अंशातील आजूबाजूचा परिसर दाखवणारा कॅमेराही बसवण्यात आला आहे. त्याचा उपयोग चालकाला गाडी पार्क करताना होतो. गाडीतील म्युझिक यंत्रणाही आधुनिक पद्धतीची आहे. (Mahindra XUV700)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.