Niva Bupa Share Price : गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात नोंदणी झालेला निवा बुपाचा शेअर कशी कामगिरी करतोय?

Niva Bupa Share Price : निवा बुपा ही आरोग्य विमा क्षेत्रातील भारतातील दुसरी कंपनी आहे.

44
Niva Bupa Share Price : गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात नोंदणी झालेला निवा बुपाचा शेअर कशी कामगिरी करतोय?
  • ऋजुता लुकतुके

भारतातील हेल्थकेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या निवा बुपा कंपनीच्या शेअरची नोंदणी गेल्याच आठवड्यात दोन्ही शेअर बाजारांमध्ये झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार तसंच मुंबई शेअर बाजारात ६ टक्के प्रिमिअमवर नोंदणीकृत झाला आहे. गुरुवारी बीएसईवर ७८.५ आणि एनएससीवर ७८.१ अंशांवर शेअरची प्रारंभिक नोदणी झाली होती. पण, त्यानंतर मागच्या आठवड्या भरात शेअर ६ टक्क्यांनी खाली आला आहे. एका आठवड्यात शेअरने ८०.९४ अंशांचा उच्चांक नोंदवला आहे. तर शेअरचा नीच्चांक ६९.२० अंशांचा आहे. तर शुक्रवारी आठवड्यासाठी बाजार बंद झाला तेव्हा निवा बुपाचा शेअर ७३.७२ अंशांवर बंद झाला आहे. (Niva Bupa Share Price)

(हेही वाचा – Mahindra XUV700 : महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० कारच्या किमती अचानक का वाढल्या?)

New Project 2024 11 23T212058.979

निवा बुपा ही भारतातील आरोग्यविमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. बुपा समुह आणि फेटल टोन एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने निवा बुपा हेल्थकेअर ही कंपनी उभी राहिली आहे. विम्याची रक्कम ग्राहकांना देताना त्यांचे खोटे किंवा बनावट क्लेम ओळखण्यासाठी कंपनीने एआय प्रणालीची मदत घेतली आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये तंत्रविषयक आधुनिकता आणणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. त्यामुळे दाव्यांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होते, तसंच वर सांगितल्या प्रमाणे खोटे दावेही ओळखता येतात. त्यामुळे कंपनीचा याबाबतीतला रेकॉर्ड चांगला आहे. आणि त्याचा कंपनीला आर्थिक फायदाही झाला आहे. (Niva Bupa Share Price)

(हेही वाचा – शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार)

कंपनीचं बाजारातील भांडवल १३,४७० कोटी रुपये इतकं आहे. तर पीई गुणोत्तर १५४ इतकं तगडं आहे. कंपनीच्या ताज्या तिमाही निकालांनुसार, कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढला आहे. तर उत्पन्नात ८१ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे.

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे आणि हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना शेअर खरेदी-विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.