PM Narendra Modi यांनी मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार

37
PM Narendra Modi यांनी मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार
  • प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉर्ड मोडून भारतीय जनता पक्षाला विजयी बनविले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी (२३ नोव्हेंबर) भाजपा मुख्यालयात बोलताना केले. महाराष्ट्रातील विजयाने मागील 50 वर्षांचा रेकॉर्ड मोडून काढला असा दावा सुद्धा त्यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी एकट्या भाजपाला 132 जागांवर यश मिळाले आहे. तर महायुतीने एकूण 233 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीत झालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपा मुख्यालयात महाराष्ट्रातील जनेतेचे आभार मानले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही उल्लेख केला.

पीएम मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आज महाराष्ट्रात विकासाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात लबाडी आणि फसवणूक करणाऱ्यांचा पराभव झाला आहे. फुटीरतावादी शक्तींचा पराभव झाला आहे. नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. आज घराणेशाहीचा पराभव झाला आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजून 10 मिनिटाला भाजपा मुख्यालयात पोहोचले. यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

(हेही वाचा – Uttar Pradesh मधील पोटनिवडणुकीत विधानसभेच्या नऊ पैकी सात जागा BJP ने जिंकल्या)

एक हैं तो सेफ हैं

पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, आपण एकजुटीने राहू तर सुरक्षित आहोत. हाच देशाचा महान मंत्र आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश एकता हा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. एक हैं तो सेफ हैं हा आज देशाचा महान मंत्र बनला आहे.

सर्व विक्रम मोडले : मोदी

छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे… अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या भूमीने यावेळी जुने सारे रेकॉर्ड मोडीत काढले. कोणत्याही पक्षाचा किंवा निवडणूकपूर्व आघाडीचा गेल्या ५० वर्षांतील हा सर्वात मोठा विजय आहे.

पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन 

आज महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प आणखी मजबूत केला आहे. आज मी देशभरातील भाजपा आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. दुसरीकडे महाविकास आघाडी (एमव्हीए) 49 जागांवर आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या ठरल्या आहेत. कारण त्यांच्या पक्षाने आघाडीपेक्षा पेक्षा जास्त जागा आणल्या आहेत.

अजित पवारांनीही शरद पवारांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी (शरद गट) 10 जागांवर आघाडीवर आहे. वीर सावरकर यांच्यासारख्या थोर राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे हा काँग्रेसचा स्वभाव आहे. आता काँग्रेसने तात्पुरते वीर सावरकर यांच्यावर निशाणा साधणे थांबविले आहे. पण वीर सावरकर किती महान होते हे त्यांनी कधी बघितले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.