महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यजनक लागले. या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुतीने विरोधकांचा सुपडासाफ करून टाकला. यात भाजपा सार्वधिक १३२ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. मात्र सर्व विजयी उमेदवारांपैकी अधिकाधिक मताधिक्क्य घेण्यामध्ये उबाठाने बाजी मारली आहे. उबाठाने ९२ जागा लढवल्या होत्या, मात्र अवघ्या २० जागा जिंकल्या, पण त्या जिंकलेल्या उमेदवारांना सरासरी १,११,५९१ मते पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Election)
कोणत्या पक्षाचे किती सरासरी मताधिक्क्य?
- उबाठा – २० (विजयी जागा) – १,११,५९१ (सरासरी मताधिक्क्य)
- शिंदे (शिवसेना) – ५७ (विजयी जागा) – ६३,७७५ (सरासरी मताधिक्क्य)
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार – १० (विजयी जागा) – ४२,३३८ (सरासरी मताधिक्क्य)
- भाजपा – १३२ (विजयी जागा) – ४२,०६६ (सरासरी मताधिक्क्य)
- राष्ट्रवादी (अजित पवार) – ४१ (विजयी जागा) – ३६,०७६ (सरासरी मताधिक्क्य)
- काँग्रेस – १६ (विजयी जागा) – २८,५७९ (सरासरी मताधिक्क्य)
(हेही वाचा Uttar Pradesh मधील पोटनिवडणुकीत विधानसभेच्या नऊ पैकी सात जागा BJP ने जिंकल्या)
कोणाचा किती स्ट्राईक रेट किती?
महायुती
- भाजपा – ८९.८३%
- शिवसेना – ६७. %
- राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) – ७४.५४
महाविकास आघाडी
- उबाठा – २१ %
- काँग्रेस – १४.८५%
- राष्ट्रवादी (श.प.) ११.६२%