Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिंदेनी आपला शब्द खरा करुन दाखवला; ४० आमदार सोबत नेले, ५७ आमदार निवडून आणले

102
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदेंच्या आमदारांसाठी विशेष विमानं, महायुतीच्या गोटात नेमकं काय शिजतयं ?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदेंच्या आमदारांसाठी विशेष विमानं, महायुतीच्या गोटात नेमकं काय शिजतयं ?

राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. राज्यात 133 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना 57 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर यश मिळाल आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Assembly Election Result 2024: डोंगराएवढा विजय! सर्वाधिक मताधिक्याने जिंकणारा उमेदवार ​​कोण? जाणून घ्या उमेदवारांची नावे…)

विधानसभा निवडणूक निकालात एकनाथ शिंदेंनी विजय मिळवत शिवसेनेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते. तर, विधानसभा निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिलेला शब्द खरा ठरवला आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेला भरघोस यश मिळवून दिलं आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-झारखंडमध्ये Jharkhand Mukti Morcha पुन्हा सत्तेत, एनडीए आघाडीला २४ जागांवर विजय)

एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा आकडा पन्नासच्या वर नेला. आपण जे बोललो होतो ते करुन दाखवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. या निवडणुकीत शिंदेंनी केवळ माहीममधील सदा सरवणकर वगळता साऱ्यांनाच निवडून आणले आहे. एवढेच नाही. तर शिंदेनी आपल्याकडे संख्या टिकवून ते दीड डझनांनी वाढवली आहे. म्हणजे, शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या असून, त्यांच्या तब्बल 17 जागा वाढल्याचे दिसत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024 : खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या न्यायालयातही त्याच शिवसेनेला दिला कौल!)

शहाजीबापू पाटील, सदा सरवणकर, यामिनी जाधव असे त्यांचे काही शिलेदार पराभूत झाले. पण बहुतांश आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणले. एकनाथ शिंदेंनी आपली राजकीय ताकद दाखवून दिलीय. शिवसेना कुणाची हे या विजयानं स्पष्ट झाल्याचा टोला शिवसेना प्रवक्त संजय शिरसाट यांनी लगावलाय. एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीतून त्यांचं राजकीय कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करुन दाखवलंय. या विजयानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.