राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. राज्यात 133 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना 57 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर यश मिळाल आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-BMC Election: विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार ?)
सोमवारी (25 नोव्हें.) नव्या सरकारचा शपथविधी (Oath Ceremony) होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे महायुतीकडून सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तच भाजपचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती मिळते आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकाची नेमणूक होईल. केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपची अंतर्गंत बैठक होईल. या बैठकीत भाजपचा (BJP) गटनेता निवडला जाईल. गटनेता निवडीनंतर भाजपा गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करतील. राज्यपाल सरकार स्थापनेचे निमंत्रण देतील नंतरच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना)
मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीहून केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे पत्र दिल्यानंतर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.(Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community