सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; NCP च्या आमदारांची बैठक; Ajit Pawar यांची ‘या’ पदी निवड

146

राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचा ‘सुपडा साफ’ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला (Nationalist Congress Party) देखील चांगलं यश मिळालं आहे. या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेत्याची देवगिरी बंगल्यावर (Devagiri Bungalow) बैठक पार पडली. (Ajit Pawar)

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात येणार असून. एक-दोन दिवसांत सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालानंतर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले ‘ते’ 5 आमदार पराभूत)

महायुतीने (Mahayuti) २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजपा १३२ जागा, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६, उबाठा गटाला २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.