Maharashtra Assembly 2024 Result: मुंबईत किती मतदारांनी नोटाला दिली पसंती? जाणून घ्या एका क्लिकवर 

138
राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly 2024 Result) निकाल शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. दरम्यान, महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) ‘सुपडा साफ’ झाला आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक २३० जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांमवर विजय मिळवला आहे. (Maharashtra Assembly 2024 Result)
दरम्यान, मुंबईत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) २२ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपा १५, शिवसेना ०६ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने ०१ जागांचा समावेश आहे. तर ‘सुपडा साफ’ झालेल्या महाविकास आघाडीने केवळ १४ जागांवर आपला काशा गुंडाळला आहे.    
तसेच, विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत ७० हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना ‘नोटा’ मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटांची मते ही अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या ३,८८४ आहेत. तर सर्वाधिक कमी नोटा हे मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त १३० आहे.  
मुंबई शहर (Mumbai city) जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १३ लाख ३९ हजार २९९ नागरिकांनी मतदान केले तर मुंबई उपनगरात ४३ लाख ३४ हजार ५१३ नागरिकांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदारांपैकी जवळपास १.२४ टक्के लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. या टक्केवारीनुसार सर्वाधिक १.७४ टक्के ‘नोटा’ (Vote for NOTA in Mumbai) मते मुंबई दक्षिण या मतदारसंघात पडली आहेत.

(हेही वाचा – BJP ला सर्वाधिक १,७२,९३,६५० मते; त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गटाला मिळाली मते)

मुंबईतील मतदारसंघ
  • अणुशक्ती नगर     ३,८८४
  • सायन-कोळीवाडा    १,८९०
  • मलबार हिल     २,०१५
  • कुलाबा     १,१९३
  • मुंबादेवी     १,११३
  • चारकोप     २,३१३
  • बोरीवली     ३,६३७
  • कांदिवली पूर्व     २,१६२
  • मालाड पश्चिम    १,५०२
  • चांदिवली २,२४७
  • कुर्ला     १,५९४
  • कालिना     १,६६७
  • मुलुंड     ३,८३४
  • भांडुप     २,४०६
  • विक्रोळी     १,७०९
  • घाटकोपर पूर्व    १,७१९
  • घाटकोपर पश्चिम     १,३८७
  • चेंबूर २,०१८
  • मानखुर्द- शिवाजी नगर     १३०
  • माहीम १,५५३
  • वडाळा     १,७०८
  • धारावी     १,७५६
  • वरळी     १,५६२
  • भायखळा     १,५८१
  • शिवडी     २,४६०
  • अंधेरी पश्चिम     १,८२२
  • अंधेरी पूर्व     १,५१०
  • दिंडोशी     १,५३०
  • गोरेगाव     १,८०५
  • दहिसर     २,१९१
  • वर्सोवा     १,२९८
  • जोगेश्वरी पूर्व     २,८८७
  • मागाठाणे २,८१८
  • वांद्रे पूर्व     १,९१२
  • वांद्रे पश्चिम     १,६७८
  • विलेपार्ले     २,२५५

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.