Assembly Election 2024 : मुंबई कुणाची? ठाकरेंची की भाजपाची?

141
Assembly Election 2024 : मुंबई कुणाची? ठाकरेंची की भाजपाची?
Assembly Election 2024 : मुंबई कुणाची? ठाकरेंची की भाजपाची?
  • सचिन धानजी,मुंबई

मागील अनेक वर्षांपासून उबाठा शिवसेनेकडून मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचा नारा दिला जात असून सन २०२४ विधानसभा निकालाने मुंबई ही कुणाची हे पूर्णपणे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठाव करत पक्षात बंड केल्यानंतर प्रथमच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत सहा पैंकी उबाठा शिवसेनेचे तीन खासदार आणि आघाडीचे एकूण चार खासदार निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल उधळत मुंबई ठाकरेंचीच असा नारा देणाऱ्या उबाठा विधानसभेत काही गुलाल उधळता आलेला नाही. उबाठा शिवसेनेने मुंबईत २२ जागा लढवल्या, त्यातील १० आमदार निवडून आले असून त्यातुलनेत भाजपाने १८ जागा लढवल्या आणि त्यांच्या तब्बल १५ आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे मुंबई आता ठाकरेंची राहिली नसून मुंबई आता भाजपाची झाल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर तत्कालिन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आदिश बंगल्यावर मोर्चा काढून उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेने हल्लाबोल केला होता. त्यावेळी सत्तेचा उन्माद दाखवत युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी मुंबई ठाकरेंची असल्याचा नारेबाजी केली होती, त्यानंतर सिनेट निवडणुकीत यश असो वा लोकसभेतील विजयाचा जल्लोष असो प्रत्येक वेळी मुंबईमध्ये उबाठा शिवसेनेकडून मुंबई ठाकरेंचीच अशाप्रकारची जोरदार घोषणाबाजी केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुंबई आता ठाकरेंची राहिलेली नसून मुंबई ही भाजपाची आणि हिंदुत्ववादी पक्षाच्या महायुतीची स्पष्ट दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Congress : ‘काँग्रेसमुक्त भारत’ घोषणेची आठवण करून देणारा निकाल )

या निवडणुकीत भाजपाने मुंबईत एकूण १८ जागा लढवल्या आणि त्यातील त्यांचे १५आमदार निवडून आले असून मालाडमधून विनोद शेलार, वर्सोव्यात डॉ. भारती लव्हेकर आणि कलिना अमरजित सिंह यांचा पराभव झाला आहे. मालाडमध्ये भाजपाचे विनोद शेलार यांचा ६२२७ मतांनी तर कलिनामध्ये अमरजित सिंह यांचा ५००८ मतांनी पराभव झाला, तर वर्सोव्यात डॉ. भारती लव्हेकर यांचा केवळ १६०० मतांनी पराभव झाला आहे. मालाड, कलिना या मुस्लिम बहुल भागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम आणला.

भाजपापाठोपाठ उबाठा शिवसेनेने मुंबईत एकूण २२ जागा लढवल्या. त्यातील १० जागांवर उबाठा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून १२ जागांवर त्यांना पराभव पत्कारावा लागला. कुर्ला विधानसभेत विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांचा विजय केवळ ४१८७ मतांनी झाला आहे. उबाठा शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर यांनी चांगली लढत दिली,

(हेही वाचा – Honeymoon Point: हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणे शोधताय? तर ‘हे’ नक्की वाचा)

तर एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेने मुंबईत १४ जागा लढवल्या आणि त्यातील ० ६ जागांवर त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. यात शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचा पराभव १३१६ मतांनी झाला आहे, तर जोगेश्वरीत मनिषा वायकर यांचा पराभव हा केवळ १५४१ मतांनी झाला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा काठावर निवडून आल्याने उबाठा शिवसेनेच्या दोन आमदारांची संख्या कमी होऊन शिवसेनेच्या दोन आमदारांची संख्या वाढली गेली असती.

त्यामुळे मुंबईत भाजपाचे सर्वाधिक १५ आमदार निवडून आले असून त्यापाठोपाठ उबाठा शिवसेनेचे १० आणि शिवसेनेचे ०६, काँग्रेसचे तीन, सपा आाणि एनसीपी प्रत्येकी एक आमदार निवडून आल्याने खरी मुंबई कुणाची हे आता निकालाने स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

मुंबईत कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्य आणि जिंकल्या

उबाठा शिवसेना : लढवल्या जागा २२, जिकल्या १०

शिवसेना : लढवल्या जागा १४, जिकल्या ०६

भाजपा : लढवल्या जागा १८, जिकल्या १५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.