महाराष्ट्र भाजपाचा विक्रमी सदस्य नोंदणीचा संकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची माहिती

38
महाराष्ट्र भाजपाचा विक्रमी सदस्य नोंदणीचा संकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची माहिती
महाराष्ट्र भाजपाचा विक्रमी सदस्य नोंदणीचा संकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची माहिती

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महाराष्ट्र भाजपाने राज्यात पक्ष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात १ कोटी ५१ लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला,असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार रावल, आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) ,आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) ,प्रदेश समन्वयक विश्वास पाठक(Vishwas Pathak), माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. (Chandrashekhar Bawankule)

( हेही वाचा : ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘घटेंगे तो मिटेंगे’; Suresh Chavhanke यांचा हिंदूंना सतर्कतेचा इशारा

दि.२४ नोव्हेंबर रोजी या अभियानाला प्रारंभ झाला असून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) हे या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.प्रदेश सरचिटणीस आ.विक्रांत पाटील हे या अभियानाचे प्रदेश संयोजक आहेत.सुनील राणे हे मुंबई विभाग संयोजक असून माधवी नाईक,अतुल काळसेकर यांच्याकडे कोकण विभाग, प्रा.अनिल सोले , नितीन भुतडा यांच्याकडे विदर्भाची, राजेश पांडे, विक्रम पावसकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र विभागाची,विजय चौधरी यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची तर संजय केनेकर,किरण पाटील यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सदस्यता मोहीमेला सुरुवात झाली आहे. ज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत्या त्या राज्यात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम निवडणुकीनंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात होता. त्यानुसार आता राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार आहे. (Chandrashekhar Bawankule)

मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपाचे सदस्य

भाजपाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी ८८००००२०२४ या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.