Maharashtra Assembly Election 2024: दिग्गजांना पराभवाची धूळ चारणारे ८ ‘जायंट किलर’ कोण?

148
राज्यात विधानसभा निवडणूकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यंदाच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीचा ‘सुपडा साफ’ झाला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा (ShivSena UBT Group), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, विनोद शेलार, रोहिणी खडसे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला असून, यशोमती ठाकूर यांना पराभूत करून राजेश वानखडे तिवसा मतदारसंघात जायंट किलर (Giant Killer Assembly Candidate) ठरले आहेत.  (Maharashtra Assembly Election 2024)

महाराष्ट्रातील जायंट किलर्स कोण ? 
१) पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा ३९३५५ मतांनी पराभव करत, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले हे १३९५०५ मतांनी विजयी झाले.
२) बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांना धक्का देत महायुतीच्या अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघात ११२३८६ मतांनी बाजी मारली. नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केलाय. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले. विखेंच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळे आणि निवडणूक हलक्यात घेणं थोरातांना महागात पडलंय. तर संगमनेर विधानसभा मतदारसंघात खताळ यांनी थोरातांचा १०५६० मतांनी दारुण पराभव केला आहे. 
३) अॅड. यशोमती ठाकूर
तिवसा विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपा उमेदवार राजेश वानखडे यांनी ७६१७ मतांनी त्यांचा पराभव केला. राजेश वानखडे यांना ९९.६६४ मते मिळाली. तर ठाकूर यांना ९२,०४७ मतांवर समाधान मानावे लागले.
४) महेश सावंत
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता आणि त्याच्या विजय बऱ्याच जणांना निश्चित वाटत होता. पण फक्त अमित ठाकरे यांना नाही तर सदा सरवणकर यांनाही धुळ चारत विजयी ठरले ते उबाठा गटाचे महेश सावंत. जेव्हा माहीम मतदार संघामधून महेश सावंत यांचे नाव समोर आले तेव्हा बऱ्याच जणांना धक्का बसला होता. या तिरंगी लढतीत महेश सावंत हे ५०२१३ मतांनी विजयी झाले असून, शिवसेनेचे सदा सरवणकर यांचा १३१६ मतांनी दारून पराभव झाला.

(हेही वाचा – ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘घटेंगे तो मिटेंगे’; Suresh Chavhanke यांचा हिंदूंना सतर्कतेचा इशारा)

५) स्नेहा दुबे
सहा वेळा वसईतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात महायुतीच्या स्नेहा दुबे-पंडित जायंट किलर ठरल्या आहेत. भाजपाच्या स्नेहा दुबे- पंडित यांनी ७७ हजार ५५३ मते मिळवून ३ हजार १५३ मतांनी ठाकूर यांचा पराभव केला आहे. तर महाविकास आघाडीचे विजय पाटील यांना ६२३२४ मते मिळाली. बसपाचे विनोद तांबे यांना ७४३, अपक्ष राजेंद्र ढगे ६३४, गॉडफ्री अल्मेडा ७६८, प्रल्हाद राणा ४५२आणि नोटा’ला २३४६ मिळाली आहे.

६) हिकमत उढाण
शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांना घनसावंगीत धक्का बसला असून, शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी बाजी मारली आहे. टोपे आणि उढाण यांना भाजपाचे बंडखोर अपक्ष सतीश घाटगे यांनी आव्हान दिले होते. मात्र, मतविभागणी न झाल्याने राजेश टोपे यांना मोठा फटका बसल्याचे निकालाअंती दिसून आले आहे. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून यंदाही त्यांना विजयाचा षटकार मारू असा विश्वास होता. मात्र त्यांचे राजकीय विरोधक असलेले हिकमत उढाण यांनी पाच हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत राजेश टोपेंच्या षटकार करण्याच्या स्वप्नांना धुळीस मिळवले आहे.
७) अमल महाडिक
कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना सर्वात मोठा तगडा झटका बसला असून, पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. भाजपाचे अमल महाडिक यांनी १७ हजार, ६३० मतांनी काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचा पराभव केला आहे. खा. धनंजय महाडिक यांना महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा फटका अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, कोल्हापूर दक्षिणमध्ये त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे. प्रियांका गांधी यांची सभा होऊनही फारसा परिणाम झालेला नाही.

(हेही पाहा – Assembly Election मुळे रिक्त झालेल्या परिषदेतील ६ जागांवर नाराजांची लागणार वर्णी

८) प्रवीण तायडे
परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पराभवाचा जबर धक्का बसला आहे. अचलपूर मतदारसंघात भाजपाचे प्रवीण तायडे यांनी विजय मिळवत बच्चू कडू यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आहे. प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा १२ हजार, १३१ मतांनी पराभव केला. तायडे यांना ७८ हजार, २०१ तर बच्चू कडू यांना ६६ हजार, ०७० मते मिळाली आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.