भारत निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (Chief Electoral Officer S. Chokkalingam) यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) यांची रविवारी २४ नोव्हेंबर रोजी राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली. (Assembly Election 2024)
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रविवारी २४ नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडे सादर केले.
(हेही वाचा – Assembly Election मुळे रिक्त झालेल्या परिषदेतील ६ जागांवर नाराजांची लागणार वर्णी)
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी (Chief Electoral Officer Kiran Kulkarni), सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community