विधानसभा निवडणुकीत मनसेला (MNS) जोरदार धक्का बसला. कारण महायुतीचं सरकार येईल आणि मनसेच्या (MNS) पाठिंब्यानं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाकित करणाऱ्या राज ठाकरेंना (Raj Thackeray) विधानसभेत एकही आमदार निवडून आणता आला नाही. याआधीच्या दोन निवडणुकीत किमान मनसेला (MNS) प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणता आला होता. मात्र यंदाची परिस्थिती पाहता मनसेची मान्यता रद्द होण्याची चिन्ह आहेत. (MNS)
निवडणुक आयोगाकडून राजकीय पक्षाला मान्यता कायम राखण्यासाठी काही निकष आहेत. ते निकष मनसे (MNS) पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे निवडणुक आयोग लवकरच त्यांना नोटीस पाठवेल आणि तुमची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करेल. (MNS)
राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष काय?
एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता टिकवण्यासाठी काही निकषांची पूर्तता करणं गरजेचं आहे. निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी ८ टक्के मतं आणि १ जागा किंवा ६ टक्के मतं आणि २ जागा किंवा ३ टक्के मतदान आणि ३ जागा असे मान्यतेचे निकष आहेत. यातील कोणतेच निकष मनसे पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते.(MNS)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community