Fly-91 Airline ची भरारी : सोलापूर आणि मुंबई उड्डाणाचा २३ डिसेंबरला शुभारंभ

52
Fly-91 Airline ची भरारी : सोलापूर आणि मुंबई उड्डाणाचा २३ डिसेंबरला शुभारंभ
Fly-91 Airline ची भरारी : सोलापूर आणि मुंबई उड्डाणाचा २३ डिसेंबरला शुभारंभ

गोव्यात मुख्यालय असलेल्या फ्लाय-९१ (Fly-91) या एअरलाईनच्या (Airline) वतीने येत्या २३ डिसेंबरला मुंबई आणि सोलापूरला हवाई सेवा सुरु होत आहे. सोलापूर हे भारतातील महत्त्वाचा वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र आहे. गोवा ते सोलापूर (Goa to Solapur Flight) आणि सोलापूर-मुंबई (Solapur-Mumbai Flight) अशी ही सेवा असेल असे फ्लाय-९१ एअरलाईन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Fly-91 Airline)

भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये शेवटच्या टप्प्याची हवाई कनेक्टिव्हिटी (Air connectivity) पुरवण्याच्या दृष्टिकोनासह, फ्लाय-९१ या भारतातील प्रादेशिक एअरलाईनने भारतातील महत्त्वाचा वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र असलेले सोलापूर, मुंबई आणि गोवा हि शहरे जोडली गेली आहेत. फ्लाय-९१ (Fly-91) एअरलाईनच्या या दोन नवीन थेट मार्गांची म्हणजेच गोवा-सोलापूर आणि मुंबई-सोलापूरची घोषणा अलीकडेच करण्यात आली आहे. त्यामुळे फ्लाय-९१ एअरलाईन (Fly-91 Airline) या क्षेत्रीय एअरलाईनच्या गंतव्य स्थानांची संख्या ९ वर पोहोचली आहे. गोव्यात मुख्यालय असलेली ही एअरलाईन मार्च २०२४ मध्ये सुरु झाली आहे.

(हेही वाचा – Assembly Election मुळे रिक्त झालेल्या परिषदेतील ६ जागांवर नाराजांची लागणार वर्णी)

फ्लाय-९१ च्या वतीने येत्या २३ डिसेंबरपासून या दोन मार्गांवर हि उड्डाणे सुरू होतील, आणि लवकरच या मार्गांसाठी तिकिटे उपलब्ध होतील. या उड्डाणांच्या सुरूवातीमुळे या ठिकाणांदरम्यान जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सोय उपलब्ध होईल. या दोन नवीन थेट मार्गांच्या घोषणेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे एअरलाईनचे उद्दिष्ट अधोरेखित झाले आहे. हे केंद्राच्या UDAN योजनेशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश दुर्लक्षित आणि दुर्गम भागांमधील हवाई प्रवासाची उपलब्धता वाढवणे हा आहे.

फ्लाय९१ एअरलाईनचे हे दोन नवीन थेट मार्ग जाहीर करताना आनंद होत असल्याचे फ्लाय-९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले. मुंबई आणि वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र तसेच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे सोलापूर यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी पुरवणारी फ्लाय-९१ ही एकमेव एअरलाईन असून गोव्याशी जोडणीमुळे सोलापूरच्या रहिवाशांसाठी गोव्याला सहज पर्यटनस्थळ म्हणून पोहोचता येईल, असे चाको म्हणाले. या दोन नवीन मार्गांवर फ्लाय९१ ऑपरेशन्स सुरू झाल्याने व्यापार आणि पर्यटनामध्ये वाढ होईल, तसेच या केंद्रे आणि त्यांच्या आसपासच्या भागांमध्ये शेवटच्या टप्प्याची हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबई कुणाची? ठाकरेंची की भाजपाची?)

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, (मोपा) गोवा येथे स्थित असलेली फ्लाय-९१ एअरलाईन सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि सोलापूर तसेच लक्षद्वीपमधील अगत्ती आणि बंगळुरू व हैदराबादसारख्या शहरांना जोडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, फ्लाय-९१ एअरलाईन सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवाई सेवा पुरवणारी पहिली आणि एकमेव एअरलाईन बनली आहे, ज्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे फ्लाय-९१ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.