प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर (Vivan Karulkar) याने लिहिलेल्या सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस (Sanatana Dharma: True Source of All Sciences) या पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून विवानला अनेक दिग्गजांकडून कौतुकाची थापही मिळाली आहे. इतक्या लहान वयात विवान करत असलेल्या कामाचे कौतुक भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी केले. विवानने डॉ. जोशी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी विवानच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
याआधी भारतीय सेनादलानेही विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. लवकरच या पुस्तकाची मराठी आणि हिंदी आवृत्तीही वाचकांच्या भेटीला येणार आहे. विवान कारुळकरने (Vivan Karulkar) लिहिलेल्या या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून अवघ्या १६ व्या वर्षी हे पुस्तक लिहून सनातन धर्माचा प्रसार-प्रचार करत असल्याबद्दल शाबासकीही दिली आहे. ‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले आहे. (Vivan Karulkar)
(हेही वाचा Vivan Karulkar: विवान कारुळकरच्या सनातन धर्मावरील पुस्तकाला कौतुकाची थाप; लंडनमध्ये घेण्यात आली दखल)
देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही विवान (Vivan Karulkar) याने त्याच्या पुस्तकाची प्रत प्रदान केली होती. त्यांच्याकडूनही त्याला शाबासकी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना राजभवन येथे या पुस्तकाची प्रत विवानने सहकुटुंब प्रदान केली तेव्हा राज्यपालांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हाच नवा भारत असल्याची प्रतिक्रियाही दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे (Vivan Karulkar) या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले. जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले.
Join Our WhatsApp Community