लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले…

125
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले...
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले...

राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लाडकी बहीण योजना (Ladki bahin Yojana) गेमचेंजर ठरली. लाडक्या बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला भरघोस मतं मिळाली. महायुतीने 236 जागांसह आपला दणदणीत विजय मिळवला. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला (MVA) ५० चा आकडा पण गाठता आला नाही. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा-MNS ची मान्यता धोक्यात, राज ठाकरेंच्या इंजिनला कायमचा ब्रेक लागण्याची शक्यता?)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडक्या बहि‍णींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या, तसेच लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणादेखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहि‍णींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा-महाराष्ट्र भाजपाचा विक्रमी सदस्य नोंदणीचा संकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी. आकडाबघुन काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन पडले. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय. हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100 करणार असून याचासुद्धा निर्णय आपण घेतला आहे. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला, समोरच्या लोकांना तुम्ही डम्पिंगमध्ये टाकून दिलं.” अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहि‍णींचे कौतुक करत विरोधकांवर निशाणा साधला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.