महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहिर झाला आहे. राज्यात 230 जागांवर महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला आहे. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आला नाही. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे, विधानसभा निकालानंतर विधान परिषदेची (vidhan parishad) लॉटरी कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर (vidhan parishad) आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांवर नाराज असलेल्यांना संधी दिली जाणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत.
महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार?
विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील (vidhan parishad) भाजपच्या ४ आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली. सध्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. हे चार नेते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या एका नाराजाला शांत करण्याची एकनाथ शिंदे यांना संधी आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. यानुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे आता महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष असेल. (vidhan parishad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community