Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; ‘या’ आहेत राज्यातील ५ जोड्या

97
Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; 'या' आहेत राज्यातील ५ जोड्या
Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; 'या' आहेत राज्यातील ५ जोड्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहिर झाला आहे. राज्यात 230 जागांवर महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला आहे. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) ५० चा आकडाही गाठता आला नाही. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. (Maharashtra Election 2024)

राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाही दिसत असून अनेकजण विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सध्या खासदार असलेल्यांची मुलेही निवडणुकीच्या रिंगणात होती, त्यामुळे वडिल खासदार आणि मुलगा आमदार अशाही अनेक जोड्या आहेत. त्यामध्ये कोकणातून राणे कुटुंबीय, मराठवाड्यात चव्हाण आणि भुमरे कुटुंबीय, ठाण्यातील शिंदे कुटुंबीय, बारामतीत (Baramati) पवार कुटुंबीय, मुंबईत गायकवाड कुटुंबीयांमध्ये एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी पाहायला मिळत आहे. (Maharashtra Election 2024)

खासदार-आमदार 5 जोड्या (MP-MLA)
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभेच्या रिंगणात होती. या दोन्ही मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत. त्यामुळे, एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत. मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी आमदार असा योग साधलाय. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार बनल्या आहेत. त्यानंतर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी विजय मिळवत त्या आमदार बनल्या आहेत. नांदेडमधून वडिल राज्यसभेत आणि मुलगी विधानसभेत अशी किमया साधलीय ती माजी मुख्यमंत्री आणि खा. अशोक चव्हाण यांनी. कारण, मुलगी श्रीजया चव्हाण या निवडणुकीतून आमदार बनल्या आहेत. त्यामुळे, एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नांदत आहे. बारामधून पत्नी राज्यसभा सदस्य आणि पती विधानसभेत आमदार, उपमुख्यमंत्री असा योगायोग साधलाय सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी. (Maharashtra Election 2024)

विधानसभेत भाऊबंदकी
अजित पवारांनी त्यांच्या एका पुतण्याला पराभूत केलं असलं तरी त्यांचा दुसरा पुतण्या कर्जत-जामखेडमधून विधानसभा सभागृहात दाखल झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी लोकसभेत त्यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या घरात आमदारकी आणि खासदारकी आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे, येथेही नात्यागोत्यांची घराणेशाही दिसून येते. निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर काही योगायोग होता होता राहिले आहेत. त्यामध्ये लातूरमधून दोन सख्खे भाऊ आधीच्या विधानसभेत होते, यावेळी देशमुखबंधूपैकी धीरजचा पराभव झाला आणि दोन भावांच्या दुसऱ्या जोडीला विधानसभेत जाता आलं नाही. माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत. मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत दाखल होत आहेत. (Maharashtra Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.