Assembly Election 2024 Result : सख्खे भाऊ, काका-पुतणे, बाप-लेक, पती-पत्नी निवडणूक रिंगणात.. कोण आले कोण गेले?

64
Assembly Election 2024 Result : सख्खे भाऊ, काका-पुतणे, बाप-लेक, पती-पत्नी निवडणूक रिंगणात.. कोण आले कोण गेले?
Assembly Election 2024 Result : सख्खे भाऊ, काका-पुतणे, बाप-लेक, पती-पत्नी निवडणूक रिंगणात.. कोण आले कोण गेले?

राज्यात अनेक मतदार संघात कुठे सख्खे भाऊ, तर कुठे बाप-लेक निवडणूक रिंगणात आहेत. एका ठिकाणी तर पती-पत्नीही एकमेकांच्या विरोधात निवडणूक आखाड्यात होते. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चार सख्ख्या भावांच्या जोड्या विधानसभा निवडणूक रिंगणात होत्या आणि त्यातील भाजपा-शिवसेनेच्या दोन जोड्या निवडून आल्या तर भाजपा आणि कॉँग्रेसच्या प्रत्येकी एका जोडीतील भावाला विधानसभेपर्यंत पोहोचता येणार नाही कारण जनतेने एकालाच विधानसभेत पाठवले तर दुसऱ्याला घरचा रस्ता दाखवला. (Assembly Election 2024 Result)

(हेही वाचा- लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले…)

भाजपा भाऊ-भाऊ

वांद्रे (पश्चिम) येथील भाजपा उमेदवार आशीष शेलार हे मुंबई भाजपा अध्यक्षही आहेत. आशीष यांचे सख्खे भाऊ विनोद शेलार यांना मालाडमधून पक्षाने उमेदवारी दिली. विशेष म्हणजे आशीष शेलार आणि विनोद शेलार यांचे मतदार संघ वेगवेगळे असले तरी दोनही मतदार संघात शेलार बंधूंच्या विरोधात कॉँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिले होते. वांद्रे (पश्चिम) मधून आसिफ झकारिया तर मालाड येथून अस्लम शेख निवडणूक रिंगणात होते. त्यातील आशीष शेलार यांनी विजय मिळवला तर विनोद यांना पराभव पत्करावा लागला. (Assembly Election 2024 Result)

सेना-भाजपा भाऊ-भाऊ

कोकणातील कुडाळ मतदार संघात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांना शिवसेनेकडून तर नितेश राणे यांना भाजपाकडून कणकवली मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. निलेश यांनी शिवसेना उबाठाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांना धूळ चारली. याच वैभव नाईक यांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता, त्याची परतफेड मुलाने केली. तर निलेश यांचे बंधू नितेश यांनी शिवसेना उबाठाचे संदेश पारकर यांचा पराभव केला. (Assembly Election 2024 Result)

(हेही वाचा- Rashmi Shukla देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; नेमकं कारण काय ?)

सख्खे भाऊ विधानसभेत

कोकणातीलच रत्नागिरी या मतदार संघात विद्यमान मंत्री उदय सामंत आणि राजापूरमधून त्यांचे बंधू किरण सामंत यांना शिवसेनेने (शिंदे) उमेदवारी दिली होती. हे दोनही सामंत बंधूंनी शिवसेना उबाठाचे उमेदवार अनुक्रमे बाळ माने आणि राजन साळवी यांचा पराभव केला. (Assembly Election 2024 Result)

एक विधानसभेत, एक घरी

महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे लातूर शहरचे उमेदवार अमित देशमुख आणि त्यांचे बंधू लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख हे निवडणूक रिंगणात होते. त्यातील अमित देशमुख यांनी भाजपाच्या उमेदवार अर्चना पाटील चाकुरकर यांचा ७,४०० मतांनी पराभव केला तर भाजपाचे रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांचा ६,५०० मतांनी पराभव केला. (Assembly Election 2024 Result)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रीपदे ?; संख्याबळानुसार मंत्रीपदांचा आग्रह)

वडील विधानसभेत, मुलगी घरी

याशिवाय बारामतीत काका अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार, अहेरी मतदार संघात बाप-लेक धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध मुलगी भाग्यश्री, काका धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध पुतण्या राजे अंबरिष आत्राम एकमेकांच्या विरोधात लढत होते तर मावसभाऊ वरळीतील आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व), चुलत भाऊ वरळीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे (माहीम), चुकतभाऊ कर्जत-जामखेडचे रोहित पवार आणि बारामतीचे युगेंद्र पवार, बाप-लेक मानखुर्द-शिवाजी नगरमधून नवाब मलिक आणि लेक सना मलिक अणुशक्ती नगरमधून निवडणूक रिंगणात आहे. (Assembly Election 2024 Result)

पत्नी विधानसभेत, पती घरी

याशिवाय कन्नड या मतदार संघात पती-पत्नी आमने-सामने उभे ठाकले आहेत. रंजना हर्षवर्धन जाधव या शिवसेना (शिंदे) यांच्याकडून अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. या लढतीत रंजना यांनी अपक्ष हर्षवर्धन यांचा १८,००० मतांनी पराभव केला तर शिवसेना उबाठाचे उदयसिंह राजपूत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. रंजना या भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. तर भोकरधन या मतदार संघातून दानवे यांचे पूत्र संतोष हेदेखील निवडून आले. (Assembly Election 2024 Result)

(हेही वाचा- विधानसभा निकालानंतर vidhan parishad ची लॉटरी कुणाला लागणार ? बावनकुळे, पडळकर, कराड, विटेकर निवडून आल्याने जागा रिक्त)

माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपाचे उमेदवार म्हणून ऐरोली मतदार संघातून निवडणूक जिंकले तर त्यांचे पूत्र राष्ट्रवादी (शप) उमेदवार संदीप यांना बेलापूरमध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. (Assembly Election 2024 Result)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.