-
ऋजुता लुकतुके
१९८३ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता महानगरात दिलीप संघवी यांनी मानसोपचारावरील ५ नवीन औषधं घेऊन एका छोट्या खोलीत एक कंपनी स्थापन केली. त्यांच्याकडे फक्त दोन जणांचा विपणन चमू होता. दारोदारी जाऊन ते आधी मानसोपचारावर औषधं असतात ही मूलभूत गोष्ट लोकांना समजावून सांगायचे. कारण, मनोविकार वेगळे ओळखण्याची आणि त्यावर उपचार करण्याची पद्धतच नव्हती. पण, सुरुवातीच्या अनुभवांनी खचून न जाता कंपनीचे संस्थापक दिलीप संघवी यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. आगामी १० वर्षांत न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, डायबेटोलॉजी आणि अशा एकूण १२ वैद्यकीय शाखांकडून वापरली जाणारी औषधं कंपनीने बाजारात आणली. दिलीप संघवी यांचा धडाकाच तसा होता. (Sun Pharma)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result 2024 : महायुतीला शपथविधीची घाई नाही; राष्ट्रपती राजवट लागणार का ?)
त्यासाठी सन फार्मा रिसर्च सेंटरमध्ये ते स्वत: मेहनत घेत होते. जगभरातील तज्ज डॉक्टर इथं काम करत होते. एका गुजराती वैष्णव कुटुंबातील मुलाने १०,००० रुपये भांडवलावर सुरू केलेला हा उद्योग आहे. संस्थापक दिलीप संघवी स्वत: वाणिज्य शाखेचे पदवीधर. पण, वडील शांतीलाल औषधांचे डीलर होते. त्यातून दिलीप संघवींना त्यातील खाचखळगे कळत गेले. भारतात औषध बनवली पाहिजेत हे त्यांच्या मनाने घेतलं. पुढे गुजरातमध्ये वापी इथं त्यांनी आपला औषध निर्मितीचा कारखाना सुरू केला. यश मिळत गेलं तसं ते औषधांची व्याप्ती वाढवत गेले. परदेशातून ८० टक्के औषधं आयात होत असताना तो पायंडा बदलून भारतातून परदेशात औषधं निर्यात करायची हे त्यांनी सुरुवातीपासून ठरवलं होतं. (Sun Pharma)
लगेचच त्या दिशेनं त्यांनी प्रवासही सुरू केला. त्यासाठी त्यांची रणनीती होती परदेशातील फार्मा कंपन्या ताब्यात घेण्याची. टेरो, ड्युसा, नॅटको, नोल अशा कंपन्या विकत घेण्याचा संघवी यांनी धडाका लावला. सन फार्माचा विस्तारही सुरू राहिला. पण, २०१५ मध्ये सन फार्माने देशातील तेव्हाची अग्रगण्य कंपनी रॅनबॅक्सी विकत घेतली तो कंपनीच्या वाटचालीतील एक मापदंड ठरला. कारण, त्यामुळे सन फार्मा ही भारतातील सगळ्यात मोठी फार्मा कंपनी ठरली. (Sun Pharma)
(हेही वाचा- Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; ‘या’ आहेत राज्यातील ५ जोड्या)
सध्या सन फार्मा अमेरिकेतील भारताची पाचवी मोठी फार्मा कंपनी आहे. जनरिक औषध उत्पादनात कंपनी जगात पाचवी आहे. भारताबाहेर तब्बल १०० देशांमध्ये कंपनीची औषध जातात. दिलीप संघवी आणि त्यांची दोन मुलं अलोक व विधीही आता सन फार्मामध्येच कार्यरत आहेत. स्वत: दिलीप संघवी कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात. (Sun Pharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community