आमदार राणा, अडसड, खोडके मंत्रिपदाच्या शर्यतीत; Ravi Rana यांची प्रबळ दावेदारी

83
आमदार राणा, अडसड, खोडके मंत्रिपदाच्या शर्यतीत; Ravi Rana यांची प्रबळ दावेदारी
आमदार राणा, अडसड, खोडके मंत्रिपदाच्या शर्यतीत; Ravi Rana यांची प्रबळ दावेदारी

विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला दणदणीत यश मिळाले असून, या नि या निवडणुकीत आ. रवि राणा हे सलग चवथ्यांदा निवडून आले आहे, तर धामणगावरेल्वेचे आमदार प्रताप अडसड, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके ह्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. हे तिन्ही आमदार सद्या जिल्ह्यात वरिष्ठ असल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीत तिघांच्याही नावाची चर्चा आहे. (Ravi Rana)

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर महायुतीचे सात उमेदवार निवडून आले आहे. त्यामध्ये अमरावती मतदार संघातून अजीत पवार गटाच्या आ. सुलभा खोडके, बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमानचे आ. रवि राणा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपाचे आ. प्रताप अडसड, तिवसा मतदारसंघातून राजेश वानखडे, वरूड मोर्शी मतदार संघातून उमेश यावलकर, अचलपूर मतदारसंघातून भाजपाचे प्रविण तायडे, आणि धारणी मतदार संघातून भाजपाचे केवलराम काळे हे विजयी झाले आहे. एकमेव दर्यापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उबाठा गटाचे गजानन लवटे हे विजयी झाले आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठीहालचाली वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातून मंत्रीमंडळात कुणा कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ravi Rana)

(हेही वाचा- Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; ‘या’ आहेत राज्यातील ५ जोड्या)

आ. रवि राणा है सतत चवथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून, गेल्या पाच वर्षापासून ते महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अशातच त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनित राणा यांनी अचलपूर, धारणी आणि तिवसा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे राणा दाम्पत्याचे वजन महायुतीमध्ये वाढले आहे. अशा परिस्थितीत आ. रवि राणा हे मंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. याशिवाय अमरावती मतदार संघाच्या आ. सुलभा खोडके ह्या सलग दुसऱ्यांदा अमरावती मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजीत पवार गटात प्रवेश घेतला होता. त्यामुळे अमरावती विधानसभेच्या आमदार म्हणून आ. सुलभा खोडके हे अजीत पवार गटाकडून मंत्री मंडळाच्या शर्यतीत असल्याचे बोलल्या जाते. तर धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आ. प्रताप अडसड हे सलग दुसऱ्यांदा भाजपाकडून निवडून आले आहे. जेष्ठ भाजपा नेते अरुण अडसड यांचे ते पुत्र असल्याने मंत्रिमंडळामध्ये प्रताप अडसड यांची दावेदारी देखील मजबूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्री मंडळात कुणा कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (Ravi Rana)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.