महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली. २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यातील १५ उमेदवारांनी लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतले आहे. लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेणारे सर्वच उमदेवार महायुतीचे आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘या’ जिल्ह्यात 160 पैकी 143 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त)
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) सर्वाधिक उमदेवार एका लाखाच्या मताधिक्याने जिंकले. १५ उमेदवारांपैकी भाजपच्या आठ जणांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन उमेदवारास लाखाचे मताधिक्य मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवारास एका लाखाचे मताधिक्य मिळाले नाही. परंतु काही जण ९० हजाराच्या जवळपास मताधिक्य घेऊन विजयी झाले आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; ‘या’ आहेत राज्यातील ५ जोड्या)
पिंपरी चिंचवड मतदार संघातून भाजप उमेदवार शंकर जगताप १ लाख ३ हजार ८६५ मतांनी विजयी झाले. ज्या परळीत पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला होता, त्या मतदार संघात पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी १ लाख ४० हजार २२४ मतांची लीड मिळाली. मेळघाटमध्ये केवलराम काळे यांना १ लाख ६ हजार २५७ मतांची लीड मिळाली. बगलानमध्ये दिलीप बोरसे यांनी १ लाख २९ हजार २९७ मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. बोरीवलीमध्ये संजय उपाध्याय यांनी १ लाख २५७ मतांनी विजय मिळवला. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांनी १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजय मिळवला. नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांनी १ लाख १५ हजार २८८ मतांचे मताधिक्य घेतले. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community