राजस्थान इथलं डुंगरपूर हे ठिकाण इथल्या हिरव्या संगमरवराप्रमाणेच विलोभनीय आहे. डुंगरपूर इथे सापडणारा हिरव्या रंगाचा संगमरवर जागतिक स्तरावर निर्यात केला जातो. हे ठिकाण अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं आहे. डुंगरपूरच्या ईशान्य दिशेला सर्वत्र जंगल आहे. या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. तसंच नैऋत्य दिशेकडच्या सुपीक मैदानावरही जीवसृष्टी आहे. इथून वाहणाऱ्या माही आणि सोम या दोन नद्यांवर संपूर्ण जिवसृष्टीचं पोषण होतं. (baneshwar temple)
डुंगरपूर हे इथे असलेल्या भव्य राजवाड्यांमुळे आणि वास्तुकलेमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. इथे असलेले राजवाडे आणि इतर वास्तू दगडी ‘झरोक्यांनी’ सुशोभित केलेल्या आहेत. डुंगरपूर इथले राजवाडे आणि वास्तू राणा महारावल शिवसिंग यांच्या काळात सन १७३० ते १७८५ साली बांधण्यात आलेले आहेत. डुंगरपूर हे ठिकाण इथल्या सोनारांसाठी, चांदीचं काम करणाऱ्यांसाठी, इथल्या लाखेचं काम करणाऱ्या कुशल कारागीरांसाठी तसंच त्यांनी लाखेने रंगवलेली खेळणी आणि फोटोफ्रेमसाठी प्रसिद्ध आहे. डुंगरपूर या शहराची स्थापना १२५८ साली मेवाडचे शासक करण सिंह यांचे ज्येष्ठ पुत्र रावल वीर सिंह यांनी केली. डुंगरपूर शहराच्या नंतरच्या शासकांनी शहराच्या स्थापत्य वारशामध्ये भर घातली. (baneshwar temple)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: महायुतीच्या ‘या’ १५ उमेदवारांचे मताधिक्य लाखाच्यावर!)
बनेश्वर मंदिर
बनेश्वर मंदिर हे डुंगरपूर प्रदेशातलं स्वयंभू शिवलिंग असलेलं मंदिर आहे. सोम आणि माही नद्यांच्या संगमावर हे स्वयंभू शिवलिंग निर्माण झालं होतं. या स्वयंभू शिवलिंगाची उंची पाच फूट एवढी आहे. बनेश्वर मंदिराच्या अगदी जवळच विष्णू मंदिर आहे. हे विष्णू मंदिर १७९३ साली बांधले गेले होते. मावजी यांची सून जानकुंवरी यांनी हे मंदिर बांधलं आहे. मावजी हे एक पूज्य संत आणि भगवान विष्णूचा अवतार असल्याचं मानलं जातं. (baneshwar temple)
मावजी यांनी ज्या ठिकाणी बसून देवाची साधना करायचे त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आहे, असं म्हटलं जातं. मावजी यांच्या आजे आणि वाजे नावाच्या दोन शिष्यांनी लक्ष्मी-नारायण मंदिर बांधलं. डुंगरपूर इथले लोक या मावजी आणि त्यांच्या पत्नींमध्ये हे लक्ष्मी-नारायण पाहायचे. या मंदिरा व्यतिरिक्त येथे ब्रह्मदेवाचंही मंदिर आहे. (baneshwar temple)
(हेही वाचा – bsc nursing salary : तुम्हाला माहितीय, bsc nursing मध्ये पगार किती मिळतो?)
बनेश्वर येथे दरवर्षी जत्रा भरते. इथले स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येने या जत्रेला भेट देतात. या जत्रेदरम्यान महादेवाचं मंदिर पहाटे ०५.०० वाजल्यापासून ते रात्री ११.०० वाजेपर्यंत खुलं असतं. सकाळी शिवलिंगाला स्नान केल्यावर कुंकू लावलं जातं आणि त्यानंतर ‘आरती’ केली जाते. (baneshwar temple)
संध्याकाळी शिवलिंगावर ‘भभूत’ म्हणजेच विभूती किंवा राख लावली जाते. त्यानंतर महादेवांची दिव्यारती करण्यात येते. या मंदिरामध्ये लोक गव्हाचं पीठ, डाळी, तांदूळ, गूळ, तूप, मीठ, मिरची, नारळ आणि रोख अर्पण करतात. याव्यतिरिक्त लक्ष्मी-नारायण आणि ब्रह्मदेवाच्या मंदिरात दिवसातून पाच वेळा आरती केली जाते. आरतीच्या वेळी पितळी घुंगरू वाजवले जातात. बनेश्वर मंदिराच्या जत्रेदरम्यान मठाधिशांची आरतीही केली जाते. तसंच रात्री लक्ष्मी-नारायण मंदिरात रासलीला खेळली जाते. बनेश्वर मंदिराप्रमाणेच इतर मंदिरातही लोक यथेच्छ दान करतात. (baneshwar temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community