डेव्हिड ससून लायब्ररी ही मुंबई इथली प्रसिद्ध लायब्ररी आणि हेरिटेज वास्तू आहे. शहराच्या मध्यभागी असलेली ही लायब्ररीची कल्पना बगदादी ज्यू , डेव्हिड ससून याचा मुलगा अल्बर्ट ससून याने बांधली होती. (david sassoon library)
ससून लायब्ररीचा इतिहास
१८४७ साली मुंबईत असलेल्या सरकारी टांकसाळ आणि डॉकयार्डमध्ये काम करणाऱ्या युरोपियन कर्मचाऱ्यांनी, प्रौढांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी आणि वेगवेगळी व्याख्याने आयोजित करण्यासाठी मेकॅनिक्स ही संस्था सुरू केली होती. या संस्थेतर्फे घेण्यात येणारे वर्ग आणि व्याख्याने सुरुवातीला याच ठिकाणी होत असत.
डेव्हिड ससूनच्या पाठिंब्यामुळे या जागेचं रूपांतर एका भव्य लायब्ररीत करण्यात आलं. त्यावेळी या लायब्ररीला डेव्हिड ससून लायब्ररी असं नाव देण्यात आलं. (david sassoon library)
(हेही वाचा – baneshwar temple : काय आहे डुंगरपूरमधल्या बनेश्वर मंदिराचा इतिहास?)
ही लायब्ररी १८६७ ते १८७० या कालावधीत व्हिक्टोरियन निओगोथिकच्या स्थापत्य शैलीमध्ये बांधली गेली होती. या लायब्ररीच्या बांधकामामध्ये टोकदार कमानी, प्राण्यांच्या आकृतिबंधांनी सुशोभित केलेले स्तंभ आणि सागवान लाकडावर कोरलेलं क्लिष्ट नक्षीकाम हे या लायब्ररीचं वैशिष्ट्य आहे.
काला घोडा ओलांडून पुढे गेल्यावर ही लायब्ररी रॅम्पार्ट रोड येथे स्थित आहे. या लायब्ररीचं बांधकाम १८७० साली पूर्ण झालं होतं. ससून लायब्ररीची ही इमारत एल्फिन्स्टन कॉलेज, आर्मी आणि नेव्ही बिल्डिंग आणि वॉटसन हॉटेल प्रमाणेच मालाड येथून आणलेल्या पिवळ्या दगडाचा वापर करून बांधली गेलेली आहे. ससून लायब्ररीची इमारत ही मुंबईतल्या सर्वात जुन्या वास्तूंपैकी एक आहे. (david sassoon library)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community