- प्रतिनिधी
देशातील जनता विरोधकांना सतत नाकारत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील जनतेनेही पूर्णपणे नाकारले. तरीसुद्धा विरोधक स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या कामात अडथळा आणत असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच हे शीत कालीन सत्र असल्यामुळे तेवढ्याच शांतपणे पार पडेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशन असल्याने वातावरणही थंड राहील. 2024 चा शेवट होत असून संपूर्ण देश उत्साहात 2025 च्या स्वागताची तयारी करत आहे. संसदेचे हे सत्र अनेकप्रकारे विशेष आहे. आपल्या संविधानाच्या यात्रेचे 75 व्या वर्षांत पदार्पण होत आहे. ही आपल्या लोकशाहीसाठी खूप महत्त्वाची संधी आहे.
(हेही वाचा – Special Editorial : उतू नका, मातू नका… हिंदुत्वाचा वसा सोडू नका!)
नवीन खासदारांना संधी देण्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी दुर्दैवाने काही लोक संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनतेने स्वीकारलेले नाही. मुठभर लोक हुल्लडबाजी करून संसदेला नियंत्रित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा वेळ आली तेव्हा जनतेने त्यांना शिक्षा दिली आहे. अनेकांना संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, अशी नाराजी मोदींनी व्यक्त केली.
संविधान निर्मात्यांनी संविधानाची निर्मिती करताना प्रत्येक मुद्द्यावर विस्ताराने चर्चा केली. त्यानंतर आपल्याला हे संविधान मिळाले. संसद त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. संसदेत चांगल्याप्रकारे चर्चा व्हायला हवी. अधिकाधिक लोकांनी चर्चेमध्ये योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षा मोदींनी (PM Narendra Modi) व्यक्त केली. दरम्यान, मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे 75 वे वर्ष होतील. संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील. संविधान दिनी काही महत्त्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यामध्ये असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community