- ऋजुता लुकतुके
पर्थमधील कठीण खेळपट्टीवर भारतीय संघाने झोकात सुरूवात केली आहे आणि ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभवही केला. या विजयासह आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीतही भारतीय संघाने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवला आहे. या हंगामातील भारतीय संघाचा हा नववा कसोटी विजय ठरला आहे आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर गमावलेलं अव्वल स्थान संघाने परत मिळवलं आहे. एकूण ११० गुण आणि ६१.११ यशाच्या टक्केवारी सह भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मागे सारून अव्वल ठरला आहे. (ICC Test Championship)
दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ५७.६९ गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील श्रीलंकेचे ५५.५६ टक्के गुण आहेत. आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी जून महिन्यात लॉर्डस मैदानात रंगणार आहे. तोपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच आणखी ४ कसोटी खेळणार आहे. आणि निर्विवादपणे अंतिम फेरीत जायचं असेल तर संघाला त्यातील किमान ३ जिंकाव्या लागतील. सध्या क्रमवारीतील अव्वल ५ संघ कुठले आहेत ते पाहूया, (ICC Test Championship)
(हेही वाचा – Sambhal मध्ये जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकावर मुसलमानांकडून दगडफेक; सपा खासदार, आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल)
(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे)
बोर्डर-गावस्कर चषक मालिकेत अजून ४ कसोटी बाकी आहेत आणि अजिंक्यपद स्पर्धेत या ४ कसोटीच भारतासाठी बाकी आहेत. उलट न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे त्यांना पुढे जाण्याची संधी आहे. अजिंक्यपदाची अंतिम फेरी निर्विवादपणे गाठायची असेल तर भारताला उर्वरित ४ पैकी ३ कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. (ICC Test Championship)
भारतीय संघाचे उर्वरित कसोटी सामने
४ ते ८ डिसेंबर – ॲडलेड (दिवस-रात्र सामना) वि. ऑस्ट्रेलिया
१४ ते १८ डिसेंबर – ब्रिस्बेन वि. ऑस्ट्रेलिया
२६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न वि. ऑस्ट्रेलिया
३ ते ७ जानेवारी (२०२५) – सिडनी वि. ऑस्ट्रेलिया
हेही पहा –
Join Our WhatsApp Community