मुंबई महापालिकेसाठी Shiv Sena UBT चा सावध पवित्रा

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीवर पुनर्विचार, वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं

95
मुंबई महापालिकेसाठी Shiv Sena UBT चा सावध पवित्रा
  • प्रतिनिधी

गेली २५ वर्षे मुंबईत एकहाती सत्ता राखणाऱ्या शिवसेना उबाठाला विधानसभा निवडणुकीत केवळ १० जागा जिंकून आणता आल्या. लोकसभेला महाविकास आघाडीच्या विजयाचा वारू चौफेर उधळला असला तरी विधानसभेत मोठी हार पत्करावी लागली. कॉंग्रेसकडून अशातच ठाकरें सोबतच्या आघाडीवर भाष्य केले जात आहे. त्यामुळे उबाठाने (Shiv Sena UBT) देखील आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीवर पुनर्विचार करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांकडून उद्धव-राज सोबत यावे, अशी गळ घातली जात असल्याने या पर्यायावर चाचपणी सुरू आहे. शिवसेना भवनात झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत सखोल चर्चा करण्यात आल्याचे समजते.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल, पर्थमध्ये केला नेट्समध्ये सराव)

मुंबई शहर आणि उपनगरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मागील २५ वर्षांपासून शिवसेनेने महापालिकेवर झेंडा फडकवला. परंतु, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सेनेला ८४ जागा जिंकता आल्या. तर भाजपाने ८२ जागांवर मुसंडी मारली. तरीही अपक्ष आणि मनसेच्या सहा नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेने पाच वर्षे सत्ता राखली. आता शिवसेनेतील फुटीनंतर आगामी महानगरपालिकेसाठी सज्ज होताना उद्धव ठाकरेंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय न्यायप्रविष्ट असताना, ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी मशाल ऐवजी धनुष्यबाणाला भरभरून मते दिली. परिणामी, एकनाथ शिंदे यांचे पारडे जड झाले, असा सूर शिवसैनिकांमध्ये आहे. मुंबईत मात्र शिवसेनेने १० जागा सर केल्या. परंतु, मागील निवडणुकीच्या तुलनेत हे यश कमी आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – BMC : मुंबईत ३६०५ मालमत्तांकडे सुमारे १७०० कोटींची थकबाकी; महानगरपालिकेकडून जप्ती आणि अटकावणीची कारवाई)

लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी अनेक सभा गाजवल्या. उबाठासह (Shiv Sena UBT) मित्रपक्षाला त्याचा फायदा झाला. कॉंग्रेसचे १३ खासदार निवडून आले. विधानसभेत मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवला आले नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ठाकरेंचा करिष्मा कायम राहिल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तसेच आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये हेच चित्र राहिले तर ठाकरेंच्या हातून महापालिका निसटण्याची चिन्हे आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा नेत्यांची शिवसेना भवनात महत्त्वपूर्व बैठक पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत राहिल्यामुळेच या निवडणुकीत ठाकरेंना फटका बसला. लोकसभेप्रमाणे मतदार वर्गाने साथ दिली नाही. आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना जर महाविकास आघाडी म्हणून एकत्र गेल्यास त्याचा अधिक फटका बसू शकतो. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडी म्हणून निवडणूक लढवायची का याबाबत उबाठाकडून पुनर्विचार सुरू आहे. लवकरच याबाबत स्पष्टता होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) स्वबळावर लढणार की, महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.