IPL Mega Auction : आयपीएलने ‘या’ अननुभवी खेळाडूंनाही केलं कोट्याधीश

IPL Mega Auction : आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसलेल्या ७ खेळाडूंना लिलावात लॉटरी लागली आहे.

52
IPL Mega Auction : आयपीएलने 'या' अननुभवी खेळाडूंनाही केलं कोट्याधीश
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल हा खेळ तसा षटकार आणि चौकारांचा आहे. वेगवान क्रिकेटला इथं महत्त्व आहे. तसंच लीगच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे हा खेळ युवा खेळाडूंचाही आहे. इथं संघाचं जितकं लक्ष प्रसिद्ध आणि प्रथितयश खेळाडूंवर असतं तितकंच लक्ष अष्टपैलू आणि उपयुक्त अशा युवा खेळाडूंवरही असतं. देशांतर्गत रणजी आणि सय्यद अली चषक गाजवणाऱ्या खेळाडूंवर संघ मालकांची नजर असते. (IPL Mega Auction)

आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेल्या खेळाडूंना अनकॅप्ड म्हणजेच अननुभवी म्हटलं जातं आणि अशा खेळाडूंची आधारभूत किंमत ३० लाख रुपये अशी ठरलेली आहे. तर अननुभवी खेळाडूला लिलावापूर्वी संघात कायम ठेवायचं असेल तर त्यासाठी संघ मालकांना ४ कोटी रुपये मोजावे लागतात. यश दयालला बंगळुरू संघाने ६ कोटींमध्येच आपल्याकडे ठेवलं आहे. पण, जे खेळाडू लिलावात सहभागी झाले त्यांच्यापैकी काहींना या लिलावात जॅकपॉट लागला आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – मुंबई महापालिकेसाठी Shiv Sena UBT चा सावध पवित्रा)

मेगा लिलावात कोट्यवधींची बोली लागलेले ७ अननुभवी खेळाडू बघूया,

रसिक दर – जम्मू काश्मीरच्या या तेज गोलंदाजाने गेल्या हंगामात दिल्लीकडून खेळताना मोक्याच्या वेळी यॉर्कर टाकण्याचं आपलं कसब दाखवून दिलं होतं. त्यामुळे यंदा त्याच्यासाठी बोली चढत गेली आणि शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ६ कोटींना विकत घेतलं.

नमन धीर – नमन धीरसाठी एकूण ५ फ्रँचाईजींनी बोली लावली होती. शेवटी ५.२५ कोटींवर मुंबईने राईट-टू-मॅच कार्ड वापरत त्याला आपल्याकडे ठेवलं.

अब्दुल समाद – अब्दुल समादसाठी बंगळुरू आणि लखनौ संघांनी जोरदार प्रयत्न केले. पुढे पंजाब संघही यात उतरला. पण, लखनौने ४.२० कोटी रुपयांमध्ये अब्दुलला आपल्या ताफ्यात घेतलं.

नेहल वढेरा – नेहलसाठी मुंबई संघ आपला राईट-टू-मॅच अधिकार वापरेल असं बोललं जात होतं. बोली लावताना मुंबई इंडियन्सचा सहभाग नव्हता. लखनौ, चेन्नई, पंजाब आणि दिल्ली यांची बोली वाढतच चालली होती. ती अखेर ४.२० कोटींवर पोहोचली. पण, मुंबईने हे कार्ड वापरलं नाही आणि नेहल पंजाब किंग्जकडे गेला. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – तब्बल ३४२ जणांना मिळाली कमी मते; Nawab Malik यांच्यासह मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचा समावेश)

आशुतोष शर्मा – आशुतोष शर्माने गेल्या हंगामात पंजाबसाठी दमदार कामगिरी केली होती. आताही राजस्थान आणि बंगळुरू फ्रँचाईजी त्याला आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक होत्या. पण, अखेर दिल्लीने ३.८० कोटींची सर्वोच्च बोली लावत त्याला आपल्याकडे खेचलं.

अभिनव मनोहर – अभिनव मनोहर हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि सुरुवातीला बंगळुरू आणि चेन्नईने त्याच्यासाठी चढाओढ सुरू केली असली तरी पैसे वाढत नव्हते. बंगळुरूने काही वेळानंतर बोली ९० लाखांवर चढवली आणि तिथून नव्याने संघांमध्ये चढाओढ सुरू झाली. गुजरात टायटन्स आणि हैद्राबादचे संघही त्यात आले आणि शेवटी सनरायझर्स हैद्राबादने ३.२० कोटी रुपयांत त्याला आपल्याकडे घेतलं.

अंगक्रिश रघुवंशी – अंगक्रिश रघुवंशीसाठी कोलकाता आणि चेन्नई उत्सुक होते आणि कोलकाता संघाने ३ कोटी रुपयांमध्ये त्याला विकत घेतलं. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.