संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरु होताच लोकसभा सभागृह डिजीटल झाल्याचे पहायला मिळत आहे. खासदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रॉनिक टॅब आणि डिजीटल पेनच्या मदतीने त्यांची हजेरी नोंदवली. या डिजीटल हजेरीसाठी काही खासदारांना अडचणी आल्या. मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी खासदारांची मदत केली. ज्यामुळे खासदारांनी टॅबद्वारे हजेरी नोंदवण्याच्या पद्धतीला पसंती दर्शवली. (Parliament Winter Session)
( हेही वाचा : World Chess Championship 2024 : पहिल्या सामन्यात डिंग लिरेनची गुकेशवर मात)
लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या पुढाकाराने संसद पेपरलेस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. यामध्ये लोकसभेच्या चार काऊंटरवर इलेक्ट्रॉनिक टॅब ठेवण्यात आले आहेत. तसेच सध्या या काऊंटरवर नोंदवही ठेवण्यात आली आहे. सदस्यांना टॅबचा प्राधान्याने वापर करावा आणि संसद पेपरलेस करण्यास मदत करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. (Parliament Winter Session)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community