Mumbai Terrorist Attack : २६/११ हल्ल्याला उलटली १६ वर्षे; मुंबईच्या किनारपट्टीवर सुरक्षेची मोठी आव्हाने

53
Mumbai Terorrist Attack : २६/११ हल्ला १६ वर्षानंतर... मुंबईच्या किनारपट्ट्यावर सुरक्षेचे मोठी आव्हाने
Mumbai Terorrist Attack : २६/११ हल्ला १६ वर्षानंतर... मुंबईच्या किनारपट्ट्यावर सुरक्षेचे मोठी आव्हाने

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याला १६ वर्षे उलटली तरी देखील मुंबईच्या समुद्र किनारपट्ट्यावर सुरक्षेचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या स्पीड बोटीपैकी अनेक बोटी मागील अनेक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडून आहेत. तर काही बोटी सेवाबाह्य झालेल्या आहेत. पुरेशा स्पीड बोट नसल्यामुळे पोलिसांना समुद्रगस्तीसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत एक पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर गस्तीसाठी मुंबई पोलिसाच्या (Mumbai Police) ताफ्यात ४६ बोटी तैनात करण्यात आलेल्या होत्या, त्यात १९ उभयचर नौका, ४ सागरी नौका (पाण्याखाली आणि जवळच्या किनाऱ्यावर काम करण्यास सक्षम) 23 स्पीड बोटचा समावेश होता. कालांतराने, १९ उभयचर आणि ४ सागरी नौका निकृष्ट देखभालीमुळे निकामी झाल्या. २३ स्पीड बोट चालू असताना, गेल्या अडीच वर्षांत मेंटनन्स ऑपरेटर्सनी देखभालीच्या, तसेच दुरुस्तीच्या खर्चापोटी त्यांच्या सेवा थांबवल्या. परिणामी, सध्या केवळ ९ बोटी कार्यरत आहेत, त्यामुळे मुंबई पोलिसांना ११४ किलोमीटरच्या किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येक स्पीड बोट १० किलोमीटरच्या किनाऱ्यावर गस्त घालते. महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी ७२० किलोमीटर पसरली असून त्यातील ११४ किलोमीटर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अखत्यारीत येतात. या भागातील तटीय गस्त पोलीस उपायुक्त (मोटर ट्रान्सपोर्ट-2) द्वारे व्यवस्थापित केली जाते. (Mumbai Terrorist Attack)

(हेही वाचा – Onion Rate : कांद्याचे बाजारभाव अजून काही काळ कायम राहणार)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेंटेनन्सची बिले रखडल्यामुळे काही बोटी मार्च २०२४ पासून सेवाबाह्य झाल्या आहेत; कारण दोन मेंटेनन्स ऑपरेटर्सना अडीच वर्षांहून अधिक काळ दुरुस्तीचे बील न मिळाल्यामुळे त्यांनी काम सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. अंदाजे ७ ते ९ कोटी थकीत बिले बाकी आहेत. मुंबईतील २३ स्पीड बोटींपैकी १४ कार्यरत नसलेल्या आणि धूळ खात पडलेल्या असून त्यातील फक्त ९ कार्यरत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील संबंधित विभागांनी निधी मंजूर करूनही देयके न मिळाल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. ही प्रक्रिया सध्या पुण्यातील महानिरीक्षक (मोटार वाहतूक) कार्यालयात अडकली आहे. दरम्यान, माझगावच्या लकडा बंदर येथे या बोटी ताडपत्र्यांनी झाकून ठेवल्या आहेत. पोलीस उपायुक्त निंबा पाटील यांनी पुष्टी केली की, स्पीड बोटींच्या आधुनिकी करणासाठी १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला होता. पहिल्या टप्प्यात पाच बोटी दुरुस्त आणि अपग्रेड केल्या जातील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चार आणि अंतिम टप्प्यात आणखी पाच बोटी दुरुस्त झालेल्या असतील. (Mumbai Terrorist Attack)

(हेही वाचा – EVM ला राहुल गांधींचा विरोध आणि वडील राजीव गांधींचा होता बॅलेट पेपरवर अविश्वास; काँग्रेस पूर्वीपासूनच नुसती रडारड करतेय; व्हिडीओ व्हायरल…)

मात्र, प्रलंबित थकबाकीच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास पाटील यांनी नकार दिला. त्यांनी आश्वासन दिले की गस्त थांबलेली नाही आणि सर्व ९ कार्यरत नौका बीएआरसी ते गोराई बीचपर्यंतच्या भागात २४/७ दक्षतेसह वापरल्या जात आहेत. प्रत्येक बोट कॉस्टलाइनचे १० किलोमीटर गस्त क्षेत्र व्यापते.

मुंबईत ११८ लँडिंग पॉइंट्स आहेत, ज्यांचे निरीक्षण यलो गेट पोलीस ठाणेद्वारे केले जाते. अलीकडे, काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु सुरक्षेतील त्रुटी कायम आहेत. सिंधुदुर्ग ते पालघर या किनारपट्टी वरील इतर जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत बोटींच्या कमतरतेमुळे गस्तीवरही परिणाम झाला आहे. (Mumbai Terrorist Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.