JW Marriott Mumbai Juhu : जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल मुंबई विमानतळापासून किती दूर आहे?

28
JW Marriott Mumbai Juhu : जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल मुंबई विमानतळापासून किती दूर आहे?
JW Marriott Mumbai Juhu : जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल मुंबई विमानतळापासून किती दूर आहे?
  • ऋजुता लुकतुके

जेडब्ल्यू मॅरियट (JW Marriott Mumbai Juhu) हा अमेरिकेतील प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेलचा समुह आहे. १९९० च्या दशकात त्यांनी भारतातही प्रवेश केला असून मुंबई, पुणे आणि सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांनी हॉटेल उभारली आहेत. मुंबईत जुहू आणि विले पार्ले इथं त्यांची दोन पंचतारांकित हॉटेल आहेत. यातील जेडब्ल्यू मॅरियट सहार हे हॉटेल विमानतळाला अगदी जवळ असून ते आंतराष्ट्रीय टर्मिनसपासून फक्त १.८ किमी अंतरावर आहे.

जेडब्ल्यू मॅरियट सहार इथं हॉटेलकडून विमानतळापर्यंत शटल सेवा मिळत नाही. पण, इतर अनेक सुविधा इथं उपलब्ध आहेत. तुम्हाला शनिवार – रविवार इथं घालवायचा असेल आणि इथली स्पा, रिक्रिएशन आणि जागतिक दर्जाच्या हॉटेलमध्ये जेवण यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल व्यवस्थापनाने वीक एंड पॅकेजही सुरू केली आहेत. (JW Marriott Mumbai Juhu)

(हेही वाचा – Drug Case : भारत बनत आहे, अरब आणि आफ्रिकेतील ड्रग्ज विक्रीचे हब)

तुम्हाला मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये जायचं असेल तर तुमच्याकडे दळण वळणाचे चार पर्याय उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी किंवा विले पार्ले स्थानकांतून तुम्ही रिक्षा किंवा बसने जे डब्ल्यू मॅरियटला पोहोचू शकता. तसंच मेट्रोने जायचं असेल तर मेट्रो २ लाईनवर मरोळ नाका स्थानकातून तुम्ही १५ मिनिटांत तिथे पोहोचू शकता. तर टर्मिनल २ स्थानकापासून हे हॉटेल फक्त ५ मिनिटांवर आहे. याशिवाय पश्चिम उपनगरातून अनेक बस मार्गही या हॉटेल जवळून जातात. याशिवाय रिक्षा तसंच टॅक्सीचे पर्यायही तुम्हाला उपलब्ध आहेत. (JW Marriott Mumbai Juhu)

जे डब्ल्यू मॅरियट हा अमेरिकेतील हॉटेल व्यावसायिक जे डब्ल्यू मॅरियट यांनी सुरू केलेला समुह आहे. त्यांनी पहिलं पंचतारांकित हॉटेल वॉशिंग्टन डीसी इथं बांधलं. आणि त्यानंतर त्यांच्या पुढच्या व्यवस्थापकांनी हा समुह पुढे नेला. जे डब्ल्यू यांच्या नावाचा सन्मान म्हणून या समुहालाही त्यांचं नाव देण्यात आलं आहे. २०२४ पर्यंत समुहाची जगभरात मिळून १२१ हॉटेल आहेत. आणि त्यामध्ये ४८,४३० खोल्या आहेत. भारतात मुंबई, बंगळुरू, दिल्ली इथं दोन, मसुरी, चंदिगड, गोवा, कोलकाता आणि पुणे इथं कंपनीचं एक पंचतारांकीत हॉटेल आहे. (JW Marriott Mumbai Juhu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.