-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन संघ हा मैदानावर कट्रर प्रतिस्पर्धी असतो. तिथे ते प्रतिस्पर्ध्यांना दयामाया दाखवत नाहीत. प्रसंगी अगदी शेरेबाजी करून खेळाडूला त्रासही देतात. पण, मैदानावर बाहेर हेच ऑस्ट्रेलियन खेळाडू मोठ्या मनाने पराभव आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचं कौशल्य मान्यही करतात. ऑस्ट्रेलियन मीडियाचंही तसंच आहे. पर्थ कसोटी यजमान संघाचा २९५ धावांनी धुव्वा उडाल्यावर तेच चित्र दिसलं. ऑस्ट्रेलियन मी़डियाने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि यशस्वी जैस्वालला (Yashasvi Jaiswal) डोक्यावर घेतलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पराभव हा ‘पर्थेटिक’ (पथेटिक या अर्थाने) असल्याचं वर्णन ऑस्ट्रेलियन मीडियाने केलं आहे. (Border – Gavaskar Trophy)
‘बळींनी यश मोजता येतं. पण, तुमच्यातील ऊर्जा, ईर्ष्या आणि मैदानात समोर येणारं व्यक्तिमत्त्व मोजण्यासाठी कुठलंही मोजमाप नाही,’ असं माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने बुमराहविषयी बोलताना म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा हा पराभव त्यांना एकतर्फी पराभव वाटला आणि त्याचं शल्य सगळ्याच वर्तमानपत्रांनी बोलून दाखवलं आहे. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा – Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; तर नाशिक, पुणे गारठलं!)
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालात म्हटलंय, ‘ही तर रस्त्यावर एकाच बाजूने सुरू असलेली वाहतूक होती. फक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजच तंबूत परतत होते.’ जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दोन्ही डावांमध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी भेदली, त्यासाठी त्याचं कौतुक करण्यात आलं आहे. ‘एरवी विचारपूर्वक मैदानावर खेळणारे खेळाडू बुमराहसमोर मात्र बिचकले, त्याच्या चेंडूंसाठी फलंदाजांकडे उत्तर नव्हतं,’ असं सिडनी मॉर्निंग हेराल्डने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन पराभवाचं खापर या वर्तमानपत्राने स्टिव्ह स्मिथ, लबुशेन आणि उस्मान ख्वाजावर फोडलं आहे.
📸 📸 𝙋𝙞𝙘𝙩𝙪𝙧𝙚 𝙋𝙚𝙧𝙛𝙚𝙘𝙩 𝙋𝙚𝙧𝙩𝙝 🥳
Scorecard – https://t.co/gTqS3UPruo#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/3ewM5O6DKs
— BCCI (@BCCI) November 25, 2024
‘ऑस्ट्रेलियासाठी हा दारुण पराभव होता. आणि त्यातून संघासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत,’ असं ९ न्यूजने म्हटलं आहे. तर कामगिरीचं मूल्यांकन करताना या वर्तमानपत्राने यशस्वी आणि बुमराह यांना दहा पैकी दहा गुण दिले आहेत. ‘आधीच बुमराची गोलंदाजीची शैली फलंदाजांना बुचकाळ्यात पाडणारी आहे. त्यातच गोलंदाजीची अचूकता आणि दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची हातोटी. स्विंगवर त्याचं असलेलं नियंत्रण हे बुमराहचे गुण अलौकिक आहेत. त्यामुळेच त्याने आघाडीची फळी एका दमात माघारी पाठवली. त्याचं पृथ:करण ६-३-९-३ हे खूप काही सांगणारं आहे,’ असं न्यूज ९ ने आपल्या सामन्याच्या अहवालात म्हटलं आहे. (Border – Gavaskar Trophy)
‘ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जे आव्हान समोर ठेवलं त्यापेक्षा यशस्वीचा दर्जा खूपच वरचा होता,’ असं न्यूज ९ ने यशस्वीबद्दल म्हटलं आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री Eknath Shinde राजीनामा देणार; ट्वीट करत म्हणाले…)
India take a 1-0 lead in the Border-Gavaskar Trophy after a huge win in Perth! #AUSvIND pic.twitter.com/PiCKJbFeih
— cricket.com.au (@cricketcomau) November 25, 2024
ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनीही या पराभवासाठी ऑस्ट्रेलियन संघावर ताशेरे ओढले आहेत. मार्क वॉने ‘हा पराभव तुमच्या स्मृतीमधून घालवून टाका,’ असा सल्ला संघाला दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community