Assembly Election 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार

292
Assembly Elections 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार
Assembly Elections 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) माहीममधील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि जोगेश्वरीतील शिवसेनेचे उमेदवार मनिषा रवींद्र वायकर (Manisha Waikar) यांचा पराभव झाला तरी जनतेच्या मनात त्यांनी विजय मिळवलेला आहे. पराभव समोर दिसत असतानाही शिवसेनेचे दोन्ही उमेदवार योध्दा प्रमाणे लढले आणि कडवी झुंज दिली, त्यामुळे त्यांच्या पराभवानंतरही जनतेच्या लेखी योध्दाच ठरल्याचे दिसून येत आहे.

जेव्हा एखादा सर्वे अहवाल आणि जनतेमध्ये जेव्हा एखाद्या उमेदवाराचा पराभव होणार याची जाहीर वाच्यता केली जाते आणि त्यानंतरही जर तो उमेदवार निवडणुकीला सामोरे जात कडवी झुंज देतो, तेव्हा त्या उमेदवाराला योध्दा संबोधले जाते. माहीम आणि जोगेश्चरी विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हा आधीच मानला जात होता आणि याबाबत जाहीर वाच्यता होऊन शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी कडवी झुंज देऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडला.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती)

माहीम विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे तिसऱ्या क्रमांकावर जातील असेच अनुमान लावले जात होते. आणि खरी लढत ही उबाठा शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांच्यामध्येच होईल असे बोलले जात होते. परंतु, यातही सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी कोणतीही हार न मानता मतदारांवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर महेश सावंत यांना कडवी झुंज दिली. मनसे अमित ठाकरे (Amit Thackeray) हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्याने सरवणकर विरुध्द सावंत यांच्यात झालेल्या लढतीत सावंत हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते आणि ते साडे आठ हजारांच्या पुढे अधिक मते निघून गेले होते. परंतु सरवणकर यांनी शेवटच्या चार ते पाच फेरींमध्ये सावंत यांचे मताधिक्य कापून ते दीड ते पावणे दोन हजारांवर आणून ठेवले. त्यामुळे सरवणकर यांनी दिलेल्या कडव्या झुंजीची चर्चा सावंत यांच्या विजयापेक्षा अधिक मतदारांमध्ये होत आहे. त्यामुळे सरवणकर हे लढवय्या शिवसैनिकाप्रमाणे लढले अशी प्रतिक्रिया मतदारांमधून ऐकायला मिळत आहे. (Assembly Election 2024)

तर जागेश्वरी विधानसभेतून लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर हे सुमारे ११ हजारांनी पिछाडीवर होते. या मतदार संघात उबाठा शिवसेनेचे अमोल किर्तीकर यांना सुमारे ११ हजारांचे मिळालेले मताधिक्य हे केवळ नगरसेवक असलेल्या बाळा नर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे होते. आणि नेमके तेच विधानसभा निवडणुकीत उमेदवार असल्याने शिवसेनेचे उमेदवार मनिषा रवींद्र वायकर (Manisha Waikar) यांचा पराभव मानला होता. स्वत: रवींद्र वायकर यांना जर स्वत:च्या मतदार संघात ११ हजार मते कमी पडली होती, त्या मतांची पोकळी मनिषा वायकर (Manisha Waikar) कशा भरुन काढणार असा प्रश्न उपस्थित केला होता. वायकर यांचा या मतदार संघात बाळा नर यांच्यासमोर दारुण पराभव होईल असे मानले जात होते. परंतु मनिषा वायकर (Manisha Waikar) यांना पराभव समोर दिसत असतानाही त्या निडरप्रमाणे लढल्या आणि केवळ १५४१ मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे वायकर यांनी लोकसभेत या मतदार संघात मिळालेल्या पिछाडीचा मतांची आकडेवारी कमी करून विजय मिळवण्याचा शर्थीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना अगदी काठावर पराभव सहन करावा लागला. त्यामुळे जनतेच्या मनात मनिषा वायकर (Manisha Waikar) यांनी स्थान मिळवले आहे. मनिषा वायकर (Manisha Waikar) यांचा मतांचा टक्का वाढवून त्यांना विजयाच्या समिप नेण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मनिषा वायकर यांचा काठावर झालेला पराभव पाहता जनतेच्या लेखी त्याही एक योध्दा समजल्या जात आहेत. पराभूत होऊनही त्या एकप्रकारे जिंकलेल्या आहेत अशाप्रकारची भावना जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Mumbai Local Railway Update: मध्य रेल्वेवरील लोकलसेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने)

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघ

अनंत नर (उबाठा) शिवसेना: ७७,०४४ ( १५४१ मताधिक्य) विजयी

मनिषा वायकर (शिवसेना) : ७५,५०३

भालचंद्र आंबुरे (मनसे) : १२,८०५

माहीम विधानसभा मतदार संघ

महेश सावंत (उबाठा) शिवसेना: ५०,२१३ ( १३१६मताधिक्य) विजयी

सदा सरवणकर (शिवसेना) : ४८,८८७

अमित राज ठाकरे (मनसे) : ३३,०६२

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.