IPL Mega Auction : १३ व्या वर्षी कोट्याधीश बनलेला वैभव सूर्यवंशी कोण आहे?

१३ वर्षं आणि ७ महिने वयात वैभववर राजस्थानने १.१ कोटी रुपयांची बोली लावली.

112
IPL Mega Auction : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने खरंच वय चोरलंय? लिलावात कोट्यधीश ठरल्यावर पुन्हा टीका सुरू
  • ऋजुता लुकतुके

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) १० वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी बिहारमधली त्यांची शेत जमीन विकली. मुलाची क्रिकेटची हौस भागावी एवढाच उद्देश त्या मागे होता. शिवाय समस्तीपूरपासून १५ किलोमीटर असलेल्या खेड्यातून ते मुलाला रोज क्रिकेटसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आणत होते. पण, मुलाचं कौतुक व्हायचं. तो धावा करायचा. आणि मग या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान संजीव सूर्यवंशी यांना व्हायचं. अगदी आयपीएल लिलावात वैभवने आपलं नाव नोंदवलं तेव्हाही ते मीडियाशी बोलताना म्हणाले, ‘घरातील आर्थिक चणचण अजून संपलेली नाही. पण, मुलगा प्रगती करतोय यातच आनंद आहे.’

संजीव सूर्यवंशी यांच्या घरातील आर्थिक चणचण त्यांचा मुलगा वैभवने काही मिनिटांत घालवली आहे. सौदी अरेबियात जेद्दाह इथं झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याला १.१ कोटी रुपयांत विकत घेतलं आणि त्याक्षणी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) देशातील वयाने सगळ्यात लहान कोट्याधीश क्रिकेटपटू बनला.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार)

‘कौशल्याला संधीची जोड,’ असं या क्षणाचं वर्णन बीसीसीआयच्या (BCCI) सोशल मीडिया चमूने केलं आहे. वैभवची क्रिकेटमधील प्रगती लक्षणीय आहे. आठव्या वर्षीच तो बिहारच्या १६ वर्षांखालील संघात खेळत होता. ते बघूनच संजीव यांना मुलाच्या क्रिकेटसाठी काहीतरी करावं असं पहिल्यांदा वाटलं. आणि आता १३ व्या वर्षी वैभव १९ वर्षांखालील संघात खेळतोय. तिथेच राजस्थान रॉयल्स संघ प्रशासनाची त्याच्यावर नजर गेली.

(हेही वाचा – जेव्हा भारतीय ईव्हीएमची क्षमता पाहून Elon Musk ही अचंबित होतात…)

वैभवची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. पण, दिल्ली कॅपिटल्स संघाने ३५ लाखांवरून बोली सुरू केली. राजस्थान रॉयल्सने ती वाढवत नेली. आणि दोघांमधील द्वंद्वानंतर राजस्थानने १.१ कोटी रुपयांत त्याला विकत घेतलं. वैभवने यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आयोजित केलेल्या निवड चाचणीत भाग घेतला होता. नागपूरमध्ये राजस्थानचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी एका षटकांत १७ धावा करण्याचं आवाहन वैभवसमोर ठेवलं. आणि वैभवने ३ षटकार लगावत ते पूर्ण केलं. तिथेच राजस्थानने त्याला हेरलं होतं.

(हेही वाचा – Parliament Winter Session : डिजीटल पेनद्वारे स्वाक्षरी करत संसदेत खासदारांची हजेरी)

‘आता वैभव फक्त आमचा मुलगा नाही तर तो बिहारचा मुलगा आहे. क्रिकेटमध्ये तो बिहारचं प्रतिनिधित्व करेल,’ असं लिलावानंतर संजीव सूर्यवंशी यांनी बोलून दाखवलं आहे. तर बिहार क्रिकेट असोसिएशननेही त्याचं कौतुक केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.